पंतप्रधान मोदींचा देशासमोर आदर्श, मातृवियोगाचं दु:ख पचवत विकासकामांचं लोकार्पण

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज पुन्हा एकदा एक नवा आदर्श देशासमोर ठेवला. मातृवियोगाचं वैयक्तिक दुःख पचवत पंतप्रधान पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) विकासकामांच्या (development works) लोकार्पणाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (video conferencing) उपस्थित राहीले. पंतप्रधान मोदी यांनी सकाळी अहमदाबादमध्ये त्यांच्या मातोश्री हिराबा (Heeraben Modi) यांचे अंत्यसंस्कार केले. त्यानंतर लगेच पंतप्रधान लोकार्पणाच्या कार्यक्रमात व्हर्चुअली उपस्थित राहिले. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही (Mamata Banerjee) गहिवरल्या. पंतप्रधानांनी आजचं कामकाज कमी करून थोडी विश्रांती घ्यावी असा सल्ला ममता बॅनर्जींनी पंतप्रधानांना दिला. 

7800 कोटी रुपयांच्या विकाससामांचं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालला 7800 कोटी रुपयांचे प्रकल्प (project) भेट दिले. पंतप्रधान मोदी यांनी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. पीएम मोदी यांच्यासाठी आजचा दिवस खूप दु:खद होता. पीएम मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचं आज निधन झालं. पीएम मोदी यांनी गांधीनगरमध्ये आईच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली. यानंतर ते आपल्या नियोजित कार्यक्रमांसाठी उपस्थित राहिले.

हेही वाचा :  काँग्रेस पक्षातील नेता अयोध्येला गेला तर? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'जर कोणी...'

ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं दु:ख
विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीएम मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं. ममता बॅनर्जी म्हणाल्या ‘माझी सहानुभूती तुमच्या पाठीशी आहेत. अशा दुःखद प्रसंगी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. आईपेक्षा महत्त्वाचे काहीही असू शकत नाही.

ममता बॅनर्जी यांनी पीएम मोदी यांना कार्यक्रमाचा वेळ कमी करण्याची विनंती केली. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप दुःखाचा आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, अशी मी देवाकडे प्रार्थना करेन. तुम्ही तुमच्या मातोश्रींच्या अंत्यसंस्कारातून नुकतेच आलेत म्हणून हा कार्यक्रम छोटा ठेवावा ही विनंती, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

पीएम मोदींनी केलं विकासकामांचं लोकार्पण
– पीएम मोदी यांनी हावडा ते न्यू जलपाईगुडी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला

– 2550 कोटींहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी

– कोलकाता में राष्ट्रीय गंगा परिषद की दूसरी बैठक की अध्यक्षता

– कोलकाता इथं राष्ट्रीय गंगा परिषदेच्या दुसऱ्या बैठकीचे अध्यक्षस्थान

-कोलकाता मेट्रोच्या जोका-तरातला पर्पल लाईनचं उद्घाटन 

– डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी – राष्ट्रीय जल आणि स्वच्छता प्रकल्पाच उद्घाटन

हेही वाचा :  लष्कराला 2 दिवसांत मणिपूर हिंसा थांबवणं शक्य होतं, पण 'त्यांना' आग पेटती ठेवायचीय -राहुल गांधी

पीएम मोदींच्या मातोश्रींचं निधन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी (PM Modi) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ट्विट करत आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली. यावेळी त्यांनी हिराबा यांचा एक फोटोही शेअर केला. ‘शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम…’ असं लिहित आईच्या रुपात आपल्याला दिसलेल्या तपस्वी आणि मूल्यांप्रती जीवन समर्पित करणाऱ्या एका कर्मयोगिणीला त्यांनी श्रद्धासुमनं वाहिली.  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …