TFRI 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी विविध पदांची भरती, लवकरच अर्ज करा

TFRI 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी विविध पदांची भरती, लवकरच अर्ज करा

TFRI 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी विविध पदांची भरती, लवकरच अर्ज करा

इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन, जबलपूर येथे विविध पदांच्या ४२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट tfri.icfre.gov.in द्वारे 5 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.उमेदवारांनी जारी केलेली अधिसूचना नीट वाचल्यानंतरच अर्ज करावा. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, नियमानुसार केलेला अर्जच वैध असेल.

एकूण जागा : ४२

पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) लघुलेखक – ९
२) तांत्रिक सहाय्यक – २
३) LDC – 9
४) तंत्रज्ञ – ३
५) वनरक्षक – ३
६) एमटीएस – १६

शैक्षणिक पात्रता
स्टेनोग्राफर पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असले पाहिजेत. तर MTS पदांसाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. अधिक शैक्षणिक पात्रता आणि या भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.

वय श्रेणी
या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे. दुसरीकडे, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत ३ वर्षे आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा :  खुशखबर! आयकर विभागात होणार 12 हजारांपेक्षाही अधिक पदांसाठी भरती

अर्ज फी
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु. १३००
SC/ST/महिला/PWD/ माजी-SM: रु. ८००

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि ट्रेड टेस्टद्वारे केली जाईल. लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर जारी केले जाईल.

पगार : Rs. 18000 – 92300 /-

या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा
अर्ज सुरू करण्याची तारीख – 7 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मार्च 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

RBI मार्फत ‘ऑफिसर्स ग्रेड बी’ पदांसाठी मोठी भरती ; पदवीधरांना सुवर्ण संधी..

RBI मार्फत ‘ऑफिसर्स ग्रेड बी’ पदांसाठी मोठी भरती ; पदवीधरांना सुवर्ण संधी..

RBI Grade B Bharti 2024 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या …

सायकलपटू प्रियांका कारंडे झाली पोलीस उपनिरीक्षक !

सायकलपटू प्रियांका कारंडे झाली पोलीस उपनिरीक्षक !

MPSC Success Story : खेळ आणि अभ्यास याचा मेळ घालून यशाची पायरी गाठता आली पाहिजे. …