Air India Peeing Incident : आरोपी शंकर मिश्रा विमानात अति दारू का प्यायला? समोर आलं मोठं कारण

Air India Peeing Incident : न्यूयॉर्क-नवी दिल्ली (New York To Delhi) एअर इंडिया विमानात (Air India Flight) एका 72 वर्षांच्या महिला प्रवाशावर एका व्यक्तीने लघुशंका केली. हे प्रकरण चांगलंच गाजलं आहे. आता या प्रकरणात नविन माहिती समोर आली आहे. अतिप्रमाणात दारू प्यायलाने (Drinking Alcohol) आरोपी शंकर मिश्राची (Shankar Mishra) शुद्ध हरपली होती. तो इतका नशेत होता की एकच वाक्य पुन्हा पुन्हा बरळत होता. बिझनेस क्लासमधल्या (Business Class) सह प्रवाशांनी याची माहिती केबिन क्रूला (Cabin Crew) दिली होती. ही घटना 26 डिसेंबरला घडली होती. 

सहप्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
एअर इंडिया विमानात बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्या आरोपी शंकर मिश्रा यांच्याबरोबर असलेल्या सहप्रवासी डॉ. सुगाता भट्टाचार्य यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं याची माहीती दिली आहे. शंकर मिश्रा एकच गोष्ट सारखी सारखी विचारल्याने तो नशेत असल्याचं आपल्याला कळालं, आपण ही गोष्ट तात्काळ विमानातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनासा आणून दिली. पण क्रू मेंबर्सने केवळ ऐकलं आणि हसत निघून गेल्या. शंकर मिश्राने डॉ. सुगाता भट्टाचार्च यांनी आपण का जास्त दारु प्यायलो याचं कारणही सांगितलं. मी खूप थकलो होतो, नीट झोपलो नव्हतो, चांगली झोप येण्यासाठी आपण दारू प्यायल्याचं शंकर मिश्रा याने सांगतिलं होतं. 

हेही वाचा :  रेल्वेचे सुपर अ‍ॅप, एका क्लिकवर तिकीट बुकींगपासून ट्रॅकींगपर्यंत सर्वकाही

एअर इंडियाने केली कारवाई
याच दरम्यान शंकर मिश्रा आपल्या सीटवर उठला तो नशेतच 72 वर्षीय महिला प्रवासाच्या सीटजवळ गेला. तिथे त्याने लघुशंका केली. दिल्लीत विमान उतरल्यानंतर शंकर मिश्रा निघून गेला. विमानातील कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. पण यानंतर त्या महिला प्रवाशाने थेट एअर इंडियाचे ग्रुप चेअरमनला पत्र लिहिली तक्रार केली. यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. 4 जानेवारीला या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. 

शंकर मिश्राला 15 दिवसांचा तुरुंगवास
आपल्या सहप्रवाशाच्या मदतीसाठी आपण उभं राहिलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे, त्यामुळे शंकर मिश्राच्या बाजूने आपण दोन पाणी पत्र एअर इंडिया व्यवस्थापनाला लिहिल्याचं डॉ. सुगाता भट्टाचार्य यांनी सांगितलं. पण पोलिसांनी शंकर मिश्राला अटक केली. न्यायालयाने त्याला 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 

हे ही वाचा : ‘मम्मी-पप्पा आता स्ट्रेस सहन होत नाही…’ चिठ्ठी लिहित ज्युनिअर डॉक्टरने संपवलं जीवन

लघुशंका करणारा उच्चपदस्थ
शंकर मिश्रा हा Wells Fargo या मल्टिनॅशनल कंपनीत व्हाईस प्रेसिडंट पदावर काम करतो. ही कंपनी फायनानशिअल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनशी संबंधीत काम करते. शंकर मिश्रा ज्या पदावर काम करतो त्यासाठी त्याला अनेकवेळा विमान प्रवास करावा लागतो. पण विमानातील प्रकरणानंतर शंकर मिश्रा याला कंपनीने निलंबित केलं आहे. 

हेही वाचा :  भारतीय संस्कृतीचं भान ठेवा! तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता ड्रेसकोड? नियम व अटी लागू

हे ही वाचा : जीवघेणी थंडी! गेल्या 24 तासात 16 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू, तर 8 दिवसात 114 जणांच्या मृत्यूची नोंद

 

कर मिश्राला होता इतका पगार
शंकर मिश्रा हा ज्या Wells Fargo या मल्टिनॅशनल कंपनीत व्हाईस प्रेसिडंट पदावर काम करतो त्या पदासाठी 51 लाख ते 96 लाख इतका पगार मिळतो. एका माहितीनुसार शंकर मिश्रालाही 51 ते 96 लाख दरम्यान पागर होता, त्यामुळे त्याचा रुबाबही मोठा होता. शंकर मिश्रा ज्या Well Fargo कंपनीत काम करत होता, त्या कंपनीचं हेरक्वाटर कॅलिफॉर्नियामध्ये आहे. 1852 साली स्थापन झालेल्या या कंपनीचं बाजारमूल्य जवळपास 161.64 डॉलर म्हणजे भारतीय चलनात जवळपास 13 लाख कोटी इतकं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …