राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित, अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा

Maharashtra budget: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पातून राज्याला, सामान्य नागरिक, शेतकऱ्यांना काय मिळणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कुसुमाग्रजांना अभिवादन करुन अजित पवारांनी अर्थसंकल्पाला सुरुवात केली. जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याचे त्यांनी सुरुवातील सांगितले. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. अटल सेतू- कोस्टल रोडला जोडण्यासाठी 2 बोगद्याची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यात गुंतवणूक वाढवण्यावर भर असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. अर्थसंकल्पाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

राज्यात सहा वंदे भार एक्सप्रेस सुरु करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. नगरविकास विभागासाठी 10 हजार कोटी, बांधकाम विभागासाठी 19 हजार 900 कोटी, सामान्य प्रशासन विभागाला 1 हजार कोटी दिले जाणार आहेत. ईस्टर्न फ्रीचा विस्तार ठाण्यापर्यंत केला जाणार आहे तर 18 लघुवस्त्रोद्योग संकुल स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

रेल्वे प्रकल्पासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. मार्च 2025 पर्यंत नवी मुंबई  विमानतळाचा पहिला टप्पा होणार आहे. नवी मुंबई विमानतळ वर्षभरात सेवेत येणार आहे.  तर संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. रात्रीचे उड्डाण घेण्यासाठी सेवा सुरु केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा :  मृत्यूच्या कुशीतली गावं! राज्यातील एक हजार गावांवर मृत्यूची टांगती तलवार, धक्कादायक अहवाल

शिधापत्रिकेवर एका साडीचे वितरण केले जाणार आहे. 300 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे. माझी वसुंधरा योजनेसाठी विशेष तरतूद केली जाणार आहे. अंगवणवाड्यांना सौर उर्जा पुरवली जाणार आहे. वीज दर सवलतीत 1 वर्षाची मुदतवाढ दिली जाणार आहे. सौरपॅनल बसवण्यासाठी सबसिडीची तरतूद करण्यात आली आहे.  

महिला बाल विकास विभागासाठी 3160 कोटी निधी देण्यात येणार आहे. 

राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. तर विदर्भातील दुष्काळ दूर करण्यासाठी 2 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. 

ग्रामीण विभागात 1 कोटी 46 लाख नळजोडणी योजना आणण्यात येणार आहेत. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘असा कसा डॉक्टर बनणार रे तू?’; छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी मोठा भाऊ देत होता परीक्षा

Fraud in NEET 2024: देशभरातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल एलिजिबीलीटी एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात येते. …

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Silver Price Today in Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कोसळले असले तरी देशातील बाजारपेठेत …