चित्रपटाचे दिग्दर्शक श्राज मेडारा यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, ‘उड जा नन्हे दिल’ चित्रपट कथेतील शुद्धता व त्याच्या भावना प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्याला स्पर्श करणाऱ्या आहेत. लहान मुले असो वा प्रौढ, श्रीमंत किंवा गरीब समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींसाठी ही एक कथा आहे जी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. चित्रपटाचे निर्माते ध्रुव करुणाकर यांनी सांगितलं की, टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘उड जा नन्हे दिल’चा प्रीमियर होत आहे. हा लहान मुलांचा चित्रपट असला तरी यात पालकांसाठीही एक सुंदर संदेश चित्रपटात आहे.
या चित्रपटाबद्दल बोलतांना अभिनेता सुनील शेट्टीने सांगितलं की, हा लहान मुलांबद्दलचा चित्रपट आहे. कामाची प्रत्येकाला समान संधी देणे आवश्यक आहे. आधुनिक काळातील पालकांसाठी हा चित्रपट नक्कीच प्रेरणादायी आहे. समानतेवर विश्वास ठेवणारी सध्याची पिढी आहे. मुलांनी कसे जगावे अशी इच्छा असणारे अनेक पालक आहेत. पालकांचा प्रामाणिकपणा आणि ते मुलांची घेत असलेली काळजी ही एक साधी गोष्ट या कथेतून मांडण्यात आली आली असल्याचे त्यांनी सांगितले.

(हे वाचा:प्रभास-दीपिकाला अॅक्शन स्टंट शिकवण्यासाठी थेट हॉलिवूडमधून येणार दिग्दर्शक;प्रोजेक्ट K करणार धमाका )
‘उड जा नन्हे दिल’ चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टी एका हायप्रोफाइल शाळेच्या मुख्याध्यापकाच्या भूमिकेत आहे. त्यांना रघू नावाचा एक हुशार मुलगा भेटतो. जो गरीब कुटुंबातील मुलगा आहे. मुख्याध्यापक आपल्या प्रसिद्ध शाळेत श्रीमंत कुटुंबातील मुलांसोबत त्या मुलाला शिकण्याची संधी देतात. रघूला सुरुवातीला भीती आणि न्यूनगंडाचा अनुभव येतो. पण जसजसा काळ जातो तसतसे त्या शाळेत त्याचे जिवलग मित्र बनतात. मैत्रीचे एक सुंदर बंधन सुरु होते. अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाचं शुटींग अवघ्या सदतीस दिवसात पूर्ण झालं आहे. टोरांटो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झालेला हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन उंचीवर नेऊन ठेवणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या