नटरंग ते तमाशा लाइव्ह इथपर्यंतचा सोनालीचा प्रवास थक्कं करणारा आहे. अभिनय, डान्स यामध्ये तरबेज असलेल्या सोनालीचं सोशल मीडियावरही नेहमीच दर्शन होत असतं. तिचा नवा फोटो किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी चाहत्यांच्या नजरा तिच्या इन्स्टापेजकडे लागलेल्या असतात. सध्या ती डान्स महाराष्ट्र डान्स या शोची परीक्षक म्हणून भेटते. सोनालीच्या स्टाइलही तिच्या चाहत्यांना भुरळ घालत असतात.
हे वाचा-Bigg Boss Marathi 4: गरबा झाला, पैशांचा पाऊसही पडला… कोणाला मिळाला पहिल्या कॅप्टनपदाचा मान?
सोनालीने तिच्या इन्स्टापेजवर एक फोटो शेअर केलाय आणि याच फोटोने सोशल मीडियावर चर्चा सुरू झालीय. मराठी रसिकांना लिंबू कलरची साडी ओळखीची आहेच. अशी ही बनवाबनवी या एव्हरग्रीन सिनेमातील लिंबू कलरची साडी कोण विसरेल बरं. पण आता सोनालीनं तिच्या स्टाइलची लिंबू कलरची साडी नेसली आहे. या फोटोसोबत लिहिलेल्या ओळींमध्ये सोनाली असं म्हणतेय की, ‘फक्त लिंबू नव्हे, लिंबू कलरची साडी’. ‘When Life Gives you lemons make lemonade’ या इंग्रजी म्हणीचा वापर करत सोनालीने म्हटलं आहे की, ‘आयुष्याने तुम्हाला लिंबू दिल्यास त्यांच्यापासून साडी बनवा’. सोनालीनं नेसलेल्या साडीवरील लेमन प्रिंट स्टायलीश असल्याने सोनाली या लूकमध्ये अगदी घायाळ करत आहे.
हे वाचा-प्रवीण तरडेंच्या फेसबुकवरुन पाठवले जातायंत भलतेच मेसेज; नेमकं काय घडलं?
सोनालीने उदयोजक कुणाल बेनोडेकरशी लग्नं केल्यानं ती कधी सासरी लंडनमध्ये असते तर कधी नवऱ्याच्या घरी दुबईत तर कधी कामाच्या निमित्ताने मुंबईत. पण सोनाली कुठेही असली तरी ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या