शाहरुखने उलगडलं बाल्कनीत जाण्यामागील गुपित, भरभराटीसाठी तुम्ही देखील अशी सजवा बाल्कनी

शाहरुख खान तब्बल चार वर्षांनंतर ‘पठाण’ या स्पाय-थ्रिलर चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर परतला. शाहरुख खान आणि त्याच्याप्रत्येक गोष्टींवर चाहत्यांना भरभरुन प्रेम केले आहे. या सगळ्यात शाहरुखचे करोडो चाहते आहेत जे त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. कोणताही सण असे किंवा थेट किंग खानचा वाढदिवस शाहरुख खानच्या घराखाली नेहमीच चाहत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या दिवशी बाल्कनीमध्ये का जातो याबद्दल सांगत आहे. (फोटो सौजन्य :- @iamsrk, istock)

हे आहे मुख्य कारण

हे आहे मुख्य कारण

या व्हिडिओमध्ये शाहरुख म्हणाला, “माझा चित्रपट हिट नसतानाही देखील चाहते मला प्रेम देतात. माझ्या घरातील वडीलधाऱ्यांनी मला एकदा सांगितले होते की, जेव्हा जेव्हा तुला वाईट वाटेल किंवा वाईट दिवस येतील तेव्हा त्यांच्याकडे जा जे तुला प्रेम देतात.’

(वाचा :- फक्त २ मिनिटांत साफ करा गॅस बर्नर, ही गोष्ट देईल चमत्कारीक रिझल्ट) ​

हेही वाचा :  ‘कुछ कुछ होनेवाला है’, ‘रोमान्स किंग’ शाहरुख खान लाँच करणार नवा ओटीटी प्लॅटफॉर्म!

काही चुकलं तर या व्यक्तीकडे जा

काही चुकलं तर या व्यक्तीकडे जा

‘जर एखादी गोष्ट काम करत नसेल किंवा चूक झाली तर तुझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींकडे जायला हवे असे शाहरुखच्या वडिलांनी त्याला सांगितले होते.

प्रेमाची ताकद

देवाने मला बाल्कनीचे तिकीट दिले आहे

देवाने मला बाल्कनीचे तिकीट दिले आहे

जेव्हा आयुष्यात वाईट काळ येईल तेव्हा तुम्ही ज्यांच्यासोबत काम करता त्यांच्याकडे जाऊ नका, जे तुम्हाला सल्ले देतील त्यांच्याकडे जाऊ नका. तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या लोकांकडे जा. मी खूप भाग्यवान आहे की माझ्यावर प्रेम करण्यसाठी लाखो लोक आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला वाईट वाटते तेव्हा मी माझ्या बाल्कनीत जातो. जेव्हा मी आनंदी असतो तेव्हा मी माझ्या बाल्कनीत जातो. देव माझ्यावर इतका दयाळू आहे की त्याने मला नेहमीच बाल्कनीचे तिकीट दिले. असंही पुढे शाहरुख म्हणाला.

(वाचा :- Kiara Sidharth करणार या पॅलेसमध्ये लग्नसोहळा, सूर्यगड पॅलेसमधील भन्नाट आयडिया घेऊन घराला द्या ‘रॉयल’ लुक) ​

कमी पैशात सजवा बाल्कनी

कमी पैशात सजवा बाल्कनी

आपलं घर नेहमी नीटनेटकं असावं असं प्रत्येकालाच वाटत. पण घराची सजावट करणे किंवा घराला नवीन लुक देणे ही खर्चिक गोष्ट असते. त्यामुळे प्रत्येकालाच सहज शक्य होईल असे नाही.आपल्या घराची सजावट करताना काही लहान लहान गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केला तर कमी खर्चात आपले घर सुंदर दिसू शकते.

हेही वाचा :  शाहरुख खानकडून अनेक गोष्टी शिकता आल्या : दीपिका पादुकोण

(वाचा :- प्लास्टिकच्या डब्ब्यांवरील तेल काही मिनिटांत होईल साफ, करुन पाहा हा सोपा उपाय) ​

झाडेचा वापर

झाडेचा वापर

घरात झाडे किंवा रोपं लावल्याने ती हवा शुद्ध करतात पण या घराला एक सुंदर लुक देखील मिळण्यास मदत होते. तुम्ही वेगवेगळ्या रंगांची आकाराची झाडे लावू शकता. झाडे लावताना रंगीबेरंगी कुंड्या किंवा ज्यूटच्या कुंडीचा वापर करा. या गोष्टीमुळे फरशी खराब होणार नाही. सध्या सध्या हँगिंग प्रकारातील रोपट्यांकडे लोकांचा कल अधिक आहे.

दिव्यांची मदत

दिव्यांची मदत

जर तुम्ही योग्य प्रमाणात लाईटिंगचा वापर केला तर तुमचे घर अधिकच आकर्षक दिसेल. सुंदर लाईटिंग घराला एक फ्रेश लुक मिळण्यास मदत होते. त्यामुळे घरातील बाल्कनीमध्ये तुम्ही लाईटिंगचा वापर करुन नवीन टच मिळवू शकता.

(वाचा :- प्लास्टिकच्या डब्ब्यांवरील तेल काही मिनिटांत होईल साफ, करुन पाहा हा सोपा उपाय)​



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …