रुपाली भोसले ही अभिनेत्री, मॉडेल आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. तिने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. बडी दूर से आये है, तेनालीराम, कुलस्वामिनी आणि आयुष्यमान भव या मालिकांमध्ये तिने अभिनय केलाय. ती मराठी बिग बॉस २ मध्ये सेलिब्रिटी सुपरस्टार म्हणून दिसली. रुपाली भोसले ही मुंबईकर आहे. तिचा जन्म २९ डिसेंबर १९८३ रोजी झाला.तिने आपले शालेय शिक्षण मुंबईतील सेंट थॉमस सेकेंडरी स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून तिने आपली पदवी पूर्ण केली.
२००७ पासून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. रिस्क या हिंदी सिनेमात ती दिसली होती. त्यानंतर २००९ मध्ये आलेल्या मन उधाण वाऱ्याचे मालिकेतून तिने मराठी इंडस्ट्रीत प्रवेश केला. २०१२ मध्ये आलेल्या ‘दोन किनारे दोघी आपण’ आणि कन्यादान मालिकेतही ती दिसली. दरम्यान आयुष्यमान भव या हिंदी मालिकेतही तिने अभिनय केलाय.
तिला योगाची आवड आहे. फिटनेससाठी ती नियमत जिम आणि योगा करते. मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वीचा रुपालीचा प्रवास प्रचंड कठीण होता. घराघरात रुपालीच्या भूमिकेला प्रेक्षक वाईट म्हणत असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र रुपालीची लोकप्रियता प्रचंड आहे. ही लोकप्रियता मिळवण्यासाठी रुपालीने खूप मेहनतही घेतली आहे.
रुपालीने एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, तिच्या बालपणापासूनच त्यांच्या कुटुंबावर एकापाठोपाठ एक संकटं येत होती. मुंबईच्या बीडीडी चाळीत लहानाची मोठी झालेल्या रुपालीच्या वडिलांना तिच्या काकांनी एक स्कीम सांगितली. रुपालीच्या वडिलांनी त्यांच्याकडे असलेले सगळे पैसे काकांच्या हाती दिले. स्कीम खोटी असल्याने रुपालीच्या काकांना अटक झाली आणि रूपालीचं कुटुंब रस्त्यावर आलं.
रुपाली भोसलेचं कुटुंब भर पावसात घरासाठी रस्त्यावर वणवण करत होतं. त्यांच्याकडे दोन वेळच्या जेवणाइतकेही पैसे नव्हते. रुपाली आणि तिचा भाऊ भिजू नये म्हणून रुपालीच्या आईने त्यांच्या डोक्यावर ताडपत्री धरली होती. याच परिस्थितीत रुपालीच्या आईला दोनदा हृदय विकाराचा झटका येऊन गेला.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या