Rucha Hasabnis : ‘साथ निभाना साथिया’ फेम रुचा हसबनीसने दिला मुलाला जन्म

Rucha Hasabnis baby Boy : ‘साथ निभाना साथिया’ (Sath Nibhana Sathiya) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत राशीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुचा हसबनीस (Rucha Hasabnis) दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.  

रुचाने सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,”हा गोडंस मुलगा आहे… फोटो खूपच कमाल आला आहे”. आलिया पाठोपाठ रुचाने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर चाहते आणि सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 


रुचाने दिली अनोख्या पद्धतीने गोड बातमी…

रुचाने दुसऱ्या प्रेग्नेंसीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तिने इन्स्टाग्राम पोस्टवर तिच्या मुलीचा पेंटिंग करतानाचा एक फोटो शेअर केला होता. त्या कॅनव्हासवर ‘मोठी बहिण’ असं लिहिलेलं दिसत होतं. रुचाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर टीव्ही जगतातील अनेक सेलिब्रिटींनी तिला गुड न्यूजसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. ‘साथ निभाना साथिया’ची राशी पुन्हा आई झाल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. 

हेही वाचा :  ‘शेहनशाह’ अन् ‘बाहुबली’ एकाच चित्रपटात! ‘प्रोजेक्ट के’मध्ये झळकणार प्रभास-अमिताभ बच्चन यांची जो

प्रेग्नेंसीदरम्यान रुचा वेगवेगळ्या प्रकारे मॅटर्निटी लीव्ह एन्जॉय करताना दिसली. बेबी बंपचे हटके फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. रुचा 2019 साली पहिल्यांदा आई झाली. लग्नानंतर रुचा अभिनय क्षेत्रापासून दुरावली. पण तरीही सोशल मीडियावर मात्र ती खूप सक्रिय आहे. रुचा 2015 साली राहुलसोबत लग्नबंधनात अडकली होती. 

संबंधित बातम्या

‘साथ निभाना साथिया’ची राशी पुन्हा होणार आई, दिली अनोख्या पद्धतीने गोड बातमी!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …