बाबोsss…हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही….

Ocean Bizarre Creatures: आपण आजपर्यंत अनेक चित्रविचित्र प्राणी पाहिले असतील. आपल्या पृथ्वीवर अशी अनेक रहस्य (Mysteries on earth) लपलेली आहेत ज्याची उकल आपल्याला अद्यापही कळली नाही. किंबहूना पृथ्वीची निर्मिती होऊन इतकी वर्षे झाली आणि विज्ञान इतकं (Science) झपाट्यानं पुढे गेलं असलं तरी आपल्याला पृथ्वीवरच्या अनेक रहस्यमय गोष्टींचा थांगपत्ता लागलेला नाही. सध्या अशाच एका रहस्यमय दुनियेची ओळख समोर आल्याचे पाहायला मिळते आहे. अशीच एक विचित्र दुनिया समुद्राच्या (World inside water) आत सापडली आहे.  या समुद्राच्या आत अनेक चित्रविचित्र प्राणी पाहून तुम्हीही चक्रवून जाल. (researchers found Bizarre ocean creatures near australia see this beautiful and different species in water) 

संशोधनकांना काही सी पार्कच्या (Sea Park) आसपास रिसर्च करताना काही असामान्य जीव सापडले आहेत. यात त्यांच्या शरीराची रचना पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. इंद्रिये आपल्या प्राण्यांप्रमाणे सामान्य असली तरी त्यांच्या शरीराचा भाग हा पुर्णत: वेगळा आहे. काहींचे रंग, रुप आणि आकारही फार वेगळा आहे. त्यामुळे हे प्राणी फारच आकर्षकही वाटत आहेत. 

साइंसलर्ट नावाच्या एका रिपोर्टनूसार, हा रहस्यमयी समुद्र ऑस्ट्रेलियााच्या (Australia) पश्चिमीकिनाऱ्यापासून 2500 किलोमीटर लांब स्थिरावलेलं आहे. रिसर्च करताना संशोधकांना या पाण्यात मासे, जलचर आणि बैटफिशसारखे (Baitfish) प्राणी सापडले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या सगळ्या जीवांबद्दल. 

हेही वाचा :  Bride Viral Video : दोन लग्न करण्यासाठी नववधूचा पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा; हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल

कसे लागले शोध? 

विक्टोरिया म्यूझियमचे वरिष्ठ क्यूरेटर टिम ओ हारा (Researcher) यांनी साइंसलर्टला सांगितले की, हे क्षेत्र डायनासोरच्या काळातलं आहे. त्यामुळे हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात सीमाऊंटनं भरलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे क्षेत्र प्रशांत आणि भारतीय महासागराच्यामध्ये येतं. त्यांनी सांगितलं की हे क्षेत्र फार सुंदर आहे आणि येथे अनेक प्रकारचे जीव आढळले आहेत आणि या क्षेत्रात अजून काही प्राणी असण्याची शक्यता आहे. 

भौगोलिक रचना कशी आहे? 

सागरी उद्यान क्षेत्राकडे जाताना संशोधकांनी उडणाऱ्या माशांचा शोध लागला. एका ब्लॉगमध्ये मत्स्य जीवशास्त्रज्ञ (Biologist) यी-काई चाई यांनी स्पष्ट केले की हे प्राणी एका भागात शिकारीसाठी दुर्मिळ आणि खुल्या समुद्रात लपलेले आहे.  या माशांना हवा वाढवण्यासाठी पंख असतात. या व्यतिरिक्त या माशांमध्ये असममित शेपटीसारखा पंख असलेला लांब खालचा लोंब असतो ज्यामुळे त्यांना जलद पोहता येते. त्यांच्या 13,000-किमी प्रवासात, संशोधकांनी प्राचीन महासागर पर्वत, ज्वालामुखी शंकू, घाटी आणि पर्वतरांगा शोधून काढल्या. त्याने प्रजातींचा मोठा खजिनाही गोळा केला. 

हेही वाचा :  Trending News : कोणी तरी येणार येणार गं...! लेकीसह आई, सासू आणि आजीही गर्भवती; VIDEO सोशल मीडियावर VIRAL

काय सांगतात तज्ञ? 

ओ’हारा यांचा अंदाज आहे की यापैकी एक तृतीयांश प्रजाती विज्ञानजगासाठी नवीन असू शकतात. संशोधकांना सैल, चिकट त्वचेसह अंध कस्क ईल देखील आढळले आहेत. संशोधकांना खोल समुद्रात एक बॅटफिशही सापडला. या गोंडस छोट्या माशांना मोठे पाय असलेले छोटे पंख असतात.

काय काय आहेत प्राणी? 

संशोधकांना ट्राइपॉड फिशही सापडला आहे. त्याचसोबत यात एक स्पाईडरविशही आहे. यात लम्बी पेल्विक फिन किरणांचा आणि टेल फिन प्रकारात मोडणाराही एक प्राणी आहे. ऐवढचं नाही तर त्यांना एक वेगळी खेकडाही शोधला आहे. समुद्री कुकंबर, समुद्री स्टार्स (Starfish), घोंघे आणि बोनी-एयर एस्फिशसारखे जीव सापडले आहेत. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे ‘प्रचार’ उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?

Pune Political News : ना भोंगा फिरवणारी रिक्षा, ना पथनाट्य कलावंतांचा टेम्पो.. ना रॅली ना …

कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले ‘जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला…’

कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी …