Jhimma 2 : सिनेमागृहात पुन्हा रंगणार ‘झिम्मा’चा खेळ!

Hemant Dhome Jhimma 2 : एक वर्षापूर्वी सिनेमागृहात धुमाकूळ घातलेल्या ‘झिम्मा’ सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत ढोमेने (Hemant Dhome) नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘झिम्मा 2’ची (Jhimma 2) घोषणी केली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

हेमंतने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”पुढच्या ट्रिपची तयारी सुरू… पुन्हा खेळूया आनंदाचा खेळ..! ‘झिम्मा 2’… तुमच्या भेटीला दसऱ्याच्या मुहूर्तावर!”. हेमंतच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्स करत हेमंतला शुभेच्छा दिल्या आहेत. सिनेमागृहात पुन्हा रंगणार झिम्माचा खेळ, आता आतुरता दसऱ्याची, पुन्हा एकदा धमाल, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

हेमंत ढोमेने शेअर केली ‘झिम्मा 2’ची झलक

हेमंत ढोमेने सिनेमाची घोषणा करण्यासोबत एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘झिम्मा 2’ची झलक पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये निर्मिती सावंत म्हणजेच निर्मला पुन्हा एकदा फिरायला जाण्यासाठी साहेबांकडे म्हणजेच अनंद जोग यांच्याकडे परवानगी मागताना दिसत आहे. यावेळी साहेबांनीही ट्रीपला येण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांना नकार देत, पुन्हा एकदा ‘बाया बायाच’ ट्रीपला जायची तयारी करत असल्याचं निर्मला समजावते. साहेब मात्र निर्मलाला सूनबाईंना बरोबर घेऊन जा, असं सांगतात… आता सूनबाई कोण? यावेळी ही ट्रीप कुठे जाणार आणि यात केवळ ‘त्याच’ मैत्रिणी असणार की, आणखी मैत्रिणींची भर पडणार? हे प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळणार आहे. 


माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या प्रेमाखातरच ‘झिम्मा 2’चा निर्णय घेतला : हेमंत ढोमे 

‘झिम्मा 2′ बद्दल हेमंत ढोमे म्हणाला,”झिम्मा’ सिनेमावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. यातील प्रत्येकीमध्ये गृहिणींनी, तरुणींनी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. कधी दोन दिवसही एकट्या घराबाहेर न राहिलेल्या महिलांनी त्यांच्या मैत्रिणींसोबत आठवडाभर बाहेर जाण्याचे प्लॅन्स केले. हा सिनेमा प्रत्येक महिलेला खूप जवळचा वाटला. अनेक महिलांनी ‘झिम्मा 2’ ची मागणी केली होती. त्या माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या प्रेमाखातरच मी ‘झिम्मा 2’चा निर्णय घेतला आहे. आता लवकरच ‘झिम्मा 2’ही सीमोल्लंघन करण्यासाठी येणार आहे. या वेळी मजा डबल झाली असून हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल”. 

हेही वाचा :  Bhargavi Chirmuley : भार्गवीचं 'येतोय तो खातोय' नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

संबंधित बातम्या

Jhimma : ‘झिम्मा’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता 27 तारखेला टीव्हीवर दिसणारSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …