भारताची प्रथम फलंदाजी, गिल-मावीचं टी20 मध्ये पदार्पण, दुखापतीमुळे स्टार गोलंदाज बाहेर

India vs Sri lanka T20I: पहिल्या टी20 सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. वानखेडे येथे सुरु असलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंहला मुकावं लागले आहे. त्यामुळे युवा गोलंदाज शिवम मावी याला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय शुभमन गिल याचेही टी20 मध्ये पदार्पण केलेय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरली आहे. 

दासनु शनाका नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वानखेडेच्या मैदानावर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजयाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच मेंडीसनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्या अनेक वर्ष मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्यामुळे मैदानाची परिस्थिती पांड्याला चांगली माहिती आहे. त्यामुळे हा सामना रोमांचंक होण्याची शक्यता आहे. 

live reels News Reels

कसा आहे भारतीय संघ – 
शुभमन गिल, इशान किशन (विकेटकिपर), सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, दीपक हुड्डा, हर्षल पटेल, शिवम मावी, युजवेंद्र चहल, उमरान मलिक {S Gill, I Kishan (wk), S Yadav, S Samson, Hardik Pandya (c), A Patel, D Hooda, H Patel, S Mavi, Y Chahal, U Malik}

श्रीलंकेचा संघ
पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजय डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कप्तान), वानिन्दु हसरंगा, चामिका करुणारत्ने, महेश थीक्षणा, कसुन रजिता आणि दिलशान मदुशंका. 
[Kusal Mendis, Pathum Nissanka, Dhananjaya de Silva, Charith Asalanka, Bhanuka Rajapaksa, Dasun Shanaka, Wanindu Hasaranga, Chamika Karunaratne, Maheesh Theekshana, Kasun Rajitha, Dilshan Madushanka]

हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार आहेत. यातील 17 सामने भारतानं जिंकले आहेत. तर, 8 सामन्यात श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवता आलाय. तर, एक सामना अनिर्णित ठरलाय. भारतानं घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत एकूण 14 टी-20 सामने खेळले आहेत. यातील 14 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, दोन सामन्यात श्रीलंकेच्या संघाला बाजी मारता आली. याशिवाय, एक सामना अनिर्णित ठरलाय.

हेही वाचा :  लक्ष्य सेनची विजयी घोडदौड सुरुच, मलेशियन खेळाडूला मात देत गाठली अंतिम फेरी

कसा असेल श्रीलंकेचा भारत दौरा?
 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका सुरू होणार आहे. हा सामना मुंबईत होणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 5 जानेवारीला पुण्यात आणि 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर लगेच 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरूवात होईल. पहिला एकदिवसीय सामना गुवाहाटी येथे होणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारीला आणि तिसरा सामना 15 जानेवारीला होणार आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …