IND vs SL, Toss Update : मालिकाविजयासाठी भारत सज्ज, नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय

India vs Sri Lanka, Toss Update : पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आहे.  भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारतानं मालिकेतील पहिला सामना 2 धावांच्या फरकाने अगदी रोमहर्षक पद्धतीनं जिंकला, त्यानंतर आजचा सामना जिंकून भारत मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे.


भारत दोन बदलांसह मैदानात उतरत असून संजू सॅमसन दुखापतीमुळे संघाबाहेर असून राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) पदार्पण करत आहेत. तर हर्षल पटेलच्या जागी अर्शदीप सिंह संघात आहे. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे पाहूया… 

live reels News Reels

कशी आहे टीम इंडिया?

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल

कसा आहे श्रीलंकेचा संघ?

पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकिपर), धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दिलशान मदुशंका

हेही वाचा :  अश्विनचा मोठा विक्रम! कपिल देव यांच्यानंतर डेल स्टेनलाही टाकलं मागं

भारत विरुद्ध श्रीलंका Head to Head 

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत 27 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले. यातील 27 पैकी 18 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, 8 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. याशिवाय दोघांमधील एक सामना अनिर्णीत देखील सुटला आहे. अशारितीने  टी-20 सामन्यातील आकडेवारी पाहता भारतीय संघाचं पारडं जड दिसत आहे. 

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …