Baba vanga : महायुद्ध, त्सुनामी आणि कृत्रिम मानव… 2023 साठी बाबा वेंगाची 7 भयानक भाकितं

Baba Vanga Predictions: निसर्गानं (Nature) निर्माण केलेल्या जगावर विज्ञानाची (Science) पकड दिवसेंदिवस इतकी घट्ट होत चाललीय की माणूस आता आपल्या मर्जीनुसार काळा, गोरा, मुलगा, मुलगी किंवा हव्या त्या पद्धतीनं स्वत:च्या बाळांना डिझाईन करु शकणार आहेत. लॅब बेबीबद्दलचे (Lab Baby) दावे तुम्हाला खोटे वाटतील पण भविष्यवेत्ता बाबा वेंगानं हा दावा केलाय. अमेरिकेत झालेला 9/11 हल्ला, रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) अशी बाबा वेंगाची (Baba Vanga) भाकितं (Prediction) खरी ठरली होती.. 

कृत्रिम मानवाची निर्मिती
त्यामुळेच लॅब बेबीचं बाबा वेंगानं वर्तवलेलं भाकितही खरं होईल असं अनेकांना वाटतंय. बाबा वेंगाच्या म्हणण्यानुसार. येणाऱ्या काळात विज्ञान इतकी प्रगती करेल की लॅबमध्ये माणसांची निर्मिती होईल. 2023 मध्ये लॅबमध्ये बनणाऱ्या बाळांच्या त्वचेचा रंग, उंची, जाडी, लिंग, रुप आणि इतर वैशिष्ठ्यं आई-वडील आपल्या मर्जीनुसार ठरवू शकतील.

जर ही भविष्यवाणी खरी ठरली तर माणसाला जन्म देण्याची पारंपारिक पद्धत कायमसाठी बंद होऊन जाईल. सध्या विज्ञानानं इतकी प्रगती केलीय की तो कोणत्याही प्राण्याचा क्लोन किंवा ब्रीड तयार करता येतो. पण त्यापुढे जाऊन बाबा वेंगाने मिराकॅल बेबी किंवा लॅब बेबीची भविष्यवाणी केलीय. 2023 मध्येच लॅब बेबीचं भाकित खरं होईल असं बाबा वेंगानं सांगितलंय. इतकंच नाही तर 2023 साठी बाबा वेंगानं जगाला हादरवून सोडणारी 7 भाकितं वर्तवलीयेत. ही भाकितं खरी ठरली तर अर्ध जग नष्ट होईल. 

हेही वाचा :  मैत्रिणींसोबत ट्रिपला गेली, हॉटेलमध्ये झालं असं काही की घरी येताच महिलेने नवऱ्याला दिला घटस्फोट

भाकित क्रमांक 1 

पृथ्वीचा कक्ष बदलेल, त्यामुळे जगात प्रलय येईल

भाकित क्रमांक 2 
 
तिसरं महायुद्ध होईल, अणुबाँबचा वापर होईल (Third World War)

भाकित क्रमांक 3 

लॅब बेबीचा जन्म होईल, ज्याचा रंग, अवयव, स्वभाव वैज्ञानिक ठरवतील.

भाकित क्रमांक 4

सूर्यमालेत असे बदल होतील ज्यामुळे जगात मोठी वादळं येतील

भाकित क्रमांक 5 

पृथ्वीवर परग्रहवासीयांचा हल्ला, लाखो लोकं मरतील

भाकित क्रमांक 6 

वीजप्रकल्पात स्फोट होऊन विषारी ढग तयार होतील, ज्यामुळे भयानक रोगराई पसरेल

भाकित क्रमांक 7 

सरोगसीचा प्रश्न संपेल, नैसर्गिक जन्मावर निर्बंध येतील

नेत्रहीन बाबा वेंगाची अनेक भाकितं वर्ष 2022 मध्ये खरी ठरली होती. 1911 मध्ये बाबा वेगांचा जन्म आणि मृत्यू 1996 मध्ये झाला होता. पण बाबा वेंगानं मरण्यापूर्वी 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी केलीय. प्रत्येक वेळी बाबावेंगाची भाकितं खरी ठरतीलच असं नाही, अनेकदा भाकितं खोटी ठरतात. तरीही बाबा वेंगाच्या भाकितांची एकच चर्चा सुरु झालीय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …