Breaking News

राजू श्रीवास्तव यांच्यानंतर आणखी एका कॉमेडियनचे निधन; विनोदविश्वाला मोठा झटका

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी २१ सप्टेंबर रोजी (Raju Srivastava Death) या जगाचा निरोप घेतला. चाहते या धक्क्यातून सावरलेही नाहीत तोपर्यंत आणखी एका कॉमेडियनचे निधन झाले आहे. प्रसिद्ध विनोदवीर पराग कंसारा (Parag Kansara Passes Away) यांचे निधन झाले आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या पहिल्या सीझनमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. पराग यांचे जवळचे मित्र आणि कॉमेडियन सुनिल पाल यांनी ही दु:खद बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. आणखी एक विनोदवीर गमावल्याने चाहतेही हळहळ व्यक्त करत आहेत.

पराग कंसारा हे गुजरातत्या वडोदरा याठिकाणचे रहिवासी होते. ते ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये सहभागी झाले होते. पहिल्या सीझनमध्ये त्यांनी चाहत्यांची मनं जिंकली होती मात्र ही स्पर्धा ते जिंकले नव्हते. यानंतरही पराग यांनी अनेक कॉमेडी शोमध्ये काम केले. पण गेल्या काही वर्षांपासून ते कॉमेडी विश्वापासून दूर होते.

हे वाचा-पत्नीने घटस्फोट दिल्यानंतर नैराश्यात होता अभिनेता, सहन न झाल्यानं विष प्यायला अन्…

सुनील पाल यांनी व्यक्त केला शोक

कॉमेडियन सुनील पाल यांनी त्यांच्या मित्राच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, ‘कॉमेडीच्या जगातून आणखी एक हृदयद्रावक बातमी आली आहे. आमचे लाफ्टर चॅलेंज पार्टनर पराग कंसारा जी आता या जगात नाहीत. प्रत्येक गोष्टीच्या उलट विचार करा म्हणत ते आम्हाला हसवायचे. पराग भैय्या, कॉमेडी जगताल कुणाची नजर लागली आहे, माहीत नाही. आताच आम्ही राजूभाईंना गमावले आणि एकामागून एक विनोदाचे स्तंभ गमावत आहोत.’


पराग हे एक खूप चांगले आणि अत्यंत मुरलेले कलाकार होते, असंही पाल यावेळी म्हणाले. या व्हिडिओमध्ये सुनील पाल यांनी अभिनेता दीपेश भानचीही आठवण काढली.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous तुम्हालाही नेमका रात्रीचाच येतो जीवघेणा खोकला? मग झोपण्याआधी करा हे 5 सोपे उपाय

Check Also

नऊवारी साडीत घरातील मुलांनी धरला लावणीवर ठेका; नजरेतूनच केलं घायाळ

मुंबई, 6 ऑक्टोबर : “ALL IS WELL” म्हणत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या घराचा दरवाजा उघडला. …

साजिद खानच्या बिग बॉस एन्ट्रीवर उर्फीचा आक्षेप, म्हणाली…

मुंबई, 6 ऑक्टोबर : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेला लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ ला सुरु झाली …