जेव्हा कधी राजू कॅमेऱ्यासमोर यायचे तेव्हा ते लोकांना हसवायचे. जातानाही त्यांनी लोकांच्या चेहऱ्यावर हसू (Raju Srivastava Last Video) आणले आहे. रुग्णालयात दाखल होण्याआधी त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ करोना कॉलर ट्यूनविषयी विनोदी व्हिडिओ बवलसा होता. अमिताभ बच्चन यांच्या आवाजाताली करोना कॉलर ट्यूनविषयी त्यांनी या विनोदी व्हिडिओ बनवला आहे. त्यांनी या व्हिडिओत शशी कपूर, विनोद खन्ना यांच्या आवाजात ही कॉलर ट्यून कशी ऐकू येईल हे खास शैलीत बोलून दाखवले आहे.
हे वाचा-राजू यांनी रिक्षा चालवून भरलेली पोटाची खळगी; आज दारात उभी ऑडी अन् BMW!
या व्हिडिओमध्ये त्यांनी करोनविषयी खबरदारी घेण्याचा सल्लाही दिला असून त्यांनी पूर्ण व्हिडिओ युट्यूबवर रिलीज केला आहे. राजू रुग्णालयात भरती होण्यापूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी प्रार्थना केली होती. मात्र गेले ४० दिवस मृत्यूशी सुरू असणारी त्यांची लढाई २१ सप्टेंबर रोजी संपली आहे. राजू यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात एक न भरून टाकणारी पोकळी निर्माण झाली आहे.
कानपूरमधून आलेल्या राजू यांनी मुंबईत आपली एक ओळख निर्माण केली होती. त्यांचे वडील कवी होते, वडिलांप्रमाणे प्रसिद्ध होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या राजू यांनी सुरुवातीच्या काळात खूप कष्ट सहन केले. त्यानी विविध बॉलिवूड सिनेमात छोटे-मोठे काम केलं होतं. पण त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ने. या शोमधील त्यांचे व्हिडिओ आजही चाहते आवडीने पाहतात.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या