पुरुषांच्या सुटच्या स्लीव्सला का असतात 3 बटण? यामागील कारण खूपच रंजक

मुंबई : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडतात, ज्याकडे आपलं लक्ष नसतं. परंतु त्यामागे दडलेली रहस्ये आपल्याला चकित करतात. तुम्ही बऱ्याचदा लोकांना पार्टी किंवा लग्न कार्यामध्ये सुट-बुटमध्ये पाहिलं असेल. परंतु तुम्ही कधी या सुटला किंवा कोटला नीट पाहिलं आहे का? तुम्ही हे तर पाहिलं असेल की, सुटच्या हाताला 3 बटणं असतात. परंतु ही बटणं का असतात? किंवा याच कार्य काय याचा विचार केलाय का?

या तीन बटनांमागे दोन कारणे दडलेली आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, ब्लेझरची सुरुवात राणी एलिझाबेथ I च्या काळापासून झाली. त्यावेळी लष्कराचे सैनिक असे ब्लेझर घालायचे.

सूट स्लीव्हमध्ये 3 बटणे का असतात?

खरंतर सूटच्या स्लीव्हमध्ये 3 बटणे लावल्यानंतर सैनिकांची स्वच्छता आणि छाप वाढेल असा विश्वास होता. पण तुम्ही विचार करत असाल की, स्लीव्हमध्ये 3 बटणे असल्याने स्वच्छता कशी काय राखता येते? वास्तविक, या तीन बटणांमुळे, सैनिक त्यांचे तोंड किंवा नाक स्वच्छ करण्यासाठी त्यांच्या हाताच्या बाही वापरणे टाळतील. याशिवाय लोकांचा असा विश्वास होता की, यामुळे सैनिक त्यांच्या गणवेशाचा आदर करायला शिकतील.

तीन बटणे असल्यामुळे सैनिकांच्या बाही यामुळे घाण होणार नाहीत आणि त्यांची स्वच्छता राहील. एवढेच नाही तर सैनिकांनी स्वच्छतेसाठी अशा प्रकारे आपल्या बाहींचा वापर केला तर त्यांची छापही खराब होईल. पण सूटचं डिझाईन असं केलं गेलं.

तीन बटणे असण्याचे आणखी एक कारण म्हणजे यामुळे कोट किंवा सुट थोडा सैल होऊ शकतो.

परंतु आता सूटच्या स्लीव्हमधली बटणं ही फक्त फॅशनसाठी जोडली जातात. आता बर्‍याच सूटच्या बाहीला बटणे असतात, परंतु ते उघडता किंवा बंद करता येत नाहीत. कारण ते फक्त शोसाठी असतात आणि यामुळे सूट बनवणार्‍याचे प्रयत्न देखील कमी होतात. तीनपेक्षा जास्त बटणे असलेले सूट देखील फॅशनमध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला तशा डिझाइनचे सुट देखील दिसतील.Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जगातील अशी जागा जिथे सीट बेल्ट घातल्यास लावला जातो दंड! जाणून घ्या यामागचं कारण

मुंबई : ट्राफीकच्या महत्वाच्या नियमांपैकी एक आहे ते म्हणजे सीट बेल्ट लावणे. तुम्ही जर कार …

मुलगी बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, मात्र ‘वाघा’ने उचलून नेल्याचा आरोप!

बहराइच, उत्तर प्रदेश : Girlfriend Ran Away With Boyfriend : अनेकदा प्रेमीयुगलांना असे वाटते की …