IND vs WI 3rd T20: कोलकात्याच्या ईडन गार्डनवर काल खेळण्यात आलेल्या तिसऱ्या अखेरच्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजच्या संघाला 17 धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारतानं वेस्ट इंडीजच्या संघाला टी-20 मालिकेत क्लीन स्पीप दिलं. या विजयात भारताचा शिल्पकार ठरलेल्या सुर्यकुमारची (Suryakumar Yadav) सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. यातच सुर्यकुमारचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात सुर्यकुमार वेस्ट इंडीजच्या टी-20 संघाचा कर्णधार कायरन पोलार्डच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपताना दिसत आहे.
नुकताच सुर्यकुमार यादवनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो पोलार्डच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपताना दिसत आहे. सुर्यकुमारनं या फोटोला एंड द ब्रदरहुड कन्टिन्यू असं कॅप्शन दिलंय. सूर्यकुमारच्या या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. सूर्यकुमार आणि पोलार्डची घट्ट मैत्री आयपीएल सामन्यांमध्येही अनेकदा दिसून आली. हे दोन्ही खेळाडू अनेकदा चांगले बाँडिंग घेऊन मैदानावर दिसले आहेत. हे दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. याआधीही सुर्यकुमार यादवनं पोलार्डसोबतचा गळाभेट घेतलेला फोटो शेअर केला होता. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला होता.
सुर्यकुमार यादवचं ट्वीट-
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात सुर्यकुमार यादवनं वादळी खेळी केली. ज्यामुळं भारताला वेस्ट इंडीजवर विजय मिळवता आला. या सामन्यात सुर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यरनं अखेरच्या 4 षटकात आक्रमक फलंदाजी करत वेस्ट इंडीजच्या संघासमोर 185 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजच्या संघानं भारतीय गोलंदाजांसमोर गुघडे टेकले. दरम्यान, वेस्ट इंडीजच्या संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावून 167 धावांपर्यंत मजल मारता आली.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha