IND vs WI 3rd T20 LIVE Updates: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 मालिकेतील सुरुवातीचे पहिले दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डनवर (Eden Gardens) आज (20 फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करणार आहे.
विराट कोहली, ऋषभपंतला विश्रांती
भारताला कोलकात्याच्या मैदानावर वेस्ट इंडिज संघाविरुद्ध तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना खेळायचा आहे. मात्र, या सामन्यात विराट कोहली आणि ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आलीय. कोहलीला श्रीलंका मालिकेपूर्वी बायो बबलमधून ब्रेक देण्यात आलाय, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलीय. विराट कोहलीनं वेस्ट इंडीजद विरुद्ध तीन सामन्याची एकदिवसीय मालिका आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत.
ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता
विराट कोहलीच्या जागेवर ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता आहे. ऋतुराज गायकवाड फॉर्ममध्ये आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्यानं आपली छाप सोडलीय. महत्वाचं म्हणजे, ऋतुराज गायकवाडनं केवळ दोनच आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात 125 च्या सरासरीनं त्यानं 35 धावा केल्या आहेत. 21 ही त्याची टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक स्कोर आहे.
संघ-
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, दीपक हुड्डा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान.
वेस्ट इंडीजचा संघ-
निकोलस पूरन (विकेटकिपर), किरॉन पोलार्ड (कर्णधार), ब्रँडन किंग, काइल मेयर्स, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, रोस्टन चेस, ओडियन स्मिथ, अकेल होसेन, रोमॅरियो शेफर्ड, शेल्डन कॉट्रेल, फॅबियन ऍलन, शाई होप, डॅरेन ब्राव्हो, डॉमिनिक ड्रेक्स, हेडन वॉल्श.
हे देखील वाचा-