ट्रेवर बेलिस पंजाबचे नवे कोच
ट्रेव्हर बेलिस पंजाबचे माजी प्रशिक्षक आणि भारतीय संघाचा महान लेग स्पिनर अनिल कुंबळेची जागा घेतील. गेल्या तीन आयपीएल मोसमात पंजाब संघाची कामगिरी समाधानकारक झाली नाही. इतकच नव्हे तर कुंबळे यांच्या कार्यकाळात संघाला एकदाही प्ले ऑफमध्ये धडक मारता आली नाही. त्यामुळे पंजाब किंग्सनं अनिल कुंबळेचा प्रशिक्षकपदाचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला. कुंबळे यांच्या जागी आता ट्रेव्हर बेलिस यांची आयपीएलच्या पुढच्या सीझनसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
– ! #SherSquad, check out what our Head Coach has to say regarding his role https://t.co/dFJYx1noU3#SaddaPunjab #PunjabKings #TrevorBayliss #HeadCoach
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) September 16, 2022
हेही वाचा – T20 World Cup: आशियाचे ‘किंग’ टी20 वर्ल्ड कपसाठी सज्ज, पण दोन अनफिट खेळाडूंना का घेतलं संघात?
‘लकी कोच‘ बेलिस
आयपीएलमध्ये याआधी बेलिस यांनी 2012 ते 2014 अशी तीन वर्ष प्रशिक्षकपद सांभाळलं आहे. या तीन वर्षात ते कोलकाता नाईट रायडर्स या फ्रँचायझीचे प्रशिक्षक होते. त्यांनी तब्बल दोन वेळा कोलकात्याला विजेतेपद मिळवून दिलं. 2012 आणि 2014 साली कोलकात्याचा संघ गौतम गंभीरच्या नेतृत्वात विजेता ठरला होता. 2021 साली ते सनरायझर्स हैदराबाद संघाचेही प्रशिक्षक होते. दरम्यान 2015 साली बेलिस इंग्लंड संघाचे प्रशिक्षक बनले. पुढच्या चार वर्षात त्यांनी इंग्लंडचा सर्वोत्तम संघ तयार केला. आणि वन डे विश्वचषकाच्या इतिहासात 2019 साली बेलिस यांचा हा संघ पहिल्यांदा विश्वविजेता ठरला. त्यामुळे कोलकाता आणि इंग्लंडला विजतेपद मिळवून देणारे बेलिस पंजाबसाठीही लकी ठरतील अशी अपेक्षा आहे.
Published by:Siddhesh Kanase
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या