महाराष्ट्रातील कोल्हापूरात राहणाऱ्या कविता चावलाने एक कोटी रुपये जिंकले आहेत. या सीझनमध्ये 1 कोटी कमावणारी पहिलीच स्पर्धक कविता चावला ठरली आहे. यापहिलेही कविता यांनी कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभाग नोंदवला होता. मात्र त्या हॉटसीटपर्यंत पोहोचू शकल्या नव्हत्या. पण त्या हार न मानता पुन्हा जुद्दीने शोमध्ये परतल्या. 45 वर्षीय कविताने 1 कोटी रुपये जिंकले आहेत मात्र त्या 7 कोटी रुपयांपर्यंत पोहचल्या का नाही हे अद्याप अस्पष्टच आहे.
हेही वाचा – एअरपोर्टवर चाहत्याने केलं असं काही की Aryan Khan नेही केला सलाम
कविता तिचा मुलगा विवेकसोबत शोमध्ये सहभागी झाली होती. येत्या सोमवार आणि मंगळवारी हा भाग सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक हा भाग पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहेत. गतवर्षीच्या सीझनमध्येही अनेक महिला करोडपती झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक वर्षी अनेक स्पर्धक करोडपती बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.
दरम्यान, ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा प्रत्येक सीझन खूप लोकप्रिय ठरतो. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या चौदाव्या सीझनलाही प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत असल्याचं पहायला मिळतंय. प्रत्येक सीझनमध्ये सहभागी होणारे स्पर्धक खूप उत्साही असतात. यावेळीही ‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी यावेळीही बिग बी अमिताभ बच्चनच सांभाळत आहेत.
Published by:Sayali Zarad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या