दुसरा मार्ग म्हणजे फायबरनी समृध्द असलेल्या पदार्थांचे सेवन वाढवावे. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आहारात अधिक फळे, भाज्या आणि नट्सचा समावेश करू शकता. याव्यतिरिक्त नियमित व्यायाम आणि अॅक्टिव्ह जीवनशैली सोबतच ताण कमी केल्यास देखील बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट अँड डाएटिशियन शिखा अग्रवाल शर्मा सांगतात की, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी तुमचा डाएट प्लान काय असावा.
तुळशीच्या बिया व भिजवलेले बदाम
तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात एक चमचा भिजवलेल्या तुळशीच्या बियांनी किंवा मंजि-यांनी करावी. त्यानंतर, 5 बदाम, 1 अक्रोड आणि 3 काळे मनुके घ्यावेत आणि ते देखील रात्रभर भिजवून खाऊ शकता. (फोटो साभार : TOI)
(वाचा :- बापरे, झोपण्याच्या पोझिशनचाही होतो हेल्थवर गंभीर परिणाम, आयुर्वेदात सांगितली झोपण्याची आरोग्यदायी पोझिशन कोणती)
सुखे अंजीर
नाश्ता म्हणून तुम्ही अंजीर आणि खजूराची स्मूदी पिऊ शकता. या स्मूदीसाठी तुम्हाला 2 अंजीर, 2 खजूर, 1/4 कप ओट्स, 3/4 कप दूध, एक चिमूटभर दालचिनी, एक चिमूटभर जायफळ आणि 1 टीस्पून सब्जाच्या बिया एकत्र कराव्या लागतील. (फोटो साभार : TOI)
(वाचा :- Diabetes Metabolism : डिनरनंतर फक्त 10 मिनिटे करा हे काम, ब्लड शुगर ते पोट साफ न होणं सर्व समस्या होतील छुमंतर)
पपई
रात्री 11 वाजता जेवणापूर्वी एक वाटी पपई खा. दुपारच्या जेवणाच्या ३० मिनिटे आधी एक ग्लास ताक आणि १/२ चमचा वाटून बारीक केलेल्या अळशीच्या बियांची पावडर घ्या. (फोटो साभार : TOI)
(वाचा :- Yoga Knee Waist Pain : गुडघे व कंबरदुखी होईल झटक्यात दूर, शिल्पा शेट्टीसारखं खुर्चीत बसून करा ही 3 साधीसोपी आसनं)
मुग डाळ
दुपारी १ वाजता म्हणजेच दुपारच्या जेवणात तुम्ही नाचणीची भाकरी, तूप, हिरवी मुग डाळ खाऊ शकता. संध्याकाळी ५ च्या सुमारास तुम्ही काकडी, गाजर, बीटरूटचे लाडू सोबत हंग कर्ड डिप करू शकता. हंग कर्ड डिप बनवण्यासाठी तुम्हाला हँग कर्ड किंवा दही, 2 काकड्या, 1 मिरची, 1/2 किसलेले बीटरूट, 4 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर आवश्यक असते. (फोटो साभार : TOI)
(वाचा :- Shoulder Pain : खांदेदुखीकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, असू शकतो या 5 भयंकर आजारांचा संकेत, डॉक्टरांचा कडक इशारा)
कोमट पाण्यासोबत इसबगोल
रात्रीच्या जेवणापूर्वी १ चमचा इसबगोलची पावडर कोमट पाण्यासोबत घ्या. रात्रीच्या जेवणासाठी अर्थात डिनरसाठी संध्याकाळी सुमारे 7 वाजता भाज्या घातलेला पुलाव खाऊ शकता. एक ग्लास दुधाने दिवसाचा शेवट करावा. तुम्ही त्यात १/२ टीस्पून ऑर्गेनिक किंवा शुद्ध तूप, चिमूटभर दालचिनी आणि चिमूटभर काळीमिरी मिक्स करू शकता. (फोटो साभार : TOI)
(वाचा :- How to improve eyesight : नंबरचा चष्मा कायमचा निघून जाईल, करा 8 मिनिटांत ‘हे’ 7 उपाय, दृष्टी होईल साफ व तेज..!)
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या