या सगळ्यात राधिका तिच्या नव्या घडाळ्यामुळे नाही तर तिच्या हातावरच्या वाढलेल्या केसांमुळे चर्चेत आली आहे. तुम्हाला हे वाचताना कदाचित विचित्र वाटेल पण हेच खरं आहे. राधिकाच्या फोटोंवर तिच्या घडाळ्यापेक्षा हातावरच्या केसांवर अधिक कमेन्ट आल्या आहेत. विशेष म्हणजे लोक तिला ट्रोल करत नसून कौतुकच करत आहेत. आतापर्यंत अभिनेत्री म्हटलं की डोक्यावरच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत आखीव- रेखीव असणं गरजेचं असायचं. ती सौंदर्याचं एक मोजमापच होती.
राधिकाने मात्र हे सगळे मापदंड मोडून काढले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातावरचे वाढलेले केस स्पष्ट दिसत आहेत. अनेकदा अभिनेत्री त्या स्वतः आपण सुंदर दिसावं यासाठी प्लॅस्टिक सर्जरी, बूटॉक्स अशा एक ना अनेक गोष्ट करत असतात. अशात बॉलिवूडमध्ये राधिकासारखीही एक गुणी अभिनेत्री आहे जिला आपल्या नैसर्गिक सौंदर्यावर पूर्ण विश्वास आहे.
दरम्यान, राधिकाचं अनेकांनी भरभरून कौतुक केलं आहे. एका युझरने लिहिलं की ‘मला हे पाहून खरंच खूप आनंद झाला की तू वॅक्स न केलेल्या हाताचा फोटो टाकलास. सहसा अभिनेत्री असं करायला पाहत नाहीत.’ तर अजून एकाने लिहिले की, ‘आता शरीरावर केस असणं ही गोष्ट सामान्य आहे हे सांगण्याची गरज आहे.’ एकंदरीतच राधिकाने तिच्या एका हाताच्या फोटोनेच चाहत्यांचं मन पुन्हा एकदा जिंकलं असं म्हणायला हरकत नाही.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या