PAN Aadhaar link: माहिती जुळत नसल्यामुळे पॅन आणि आधार लिंक केले जात नाहीये? तर ‘ही’ पद्धत करा फॉलो

तुमचा पॅन आणि आधार लिंक केले नसेल, तर आयकर विभाग तुमचे पॅन कार्ड रद्द करू शकते. यासोबतच दंडही होऊ शकतो. अशा परिस्थितीत आधार आणि पॅन कार्ड लिंकिंग लवकरात लवकर व्हायला हवे.

पॅन आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. तुम्ही अद्याप तुमचा पॅन आणि आधार लिंक केले नसेल, तर आयकर विभाग तुमचे पॅन कार्ड रद्द करू शकते. यासोबतच दंडही होऊ शकतो. अशा परिस्थितीत आधार आणि पॅन कार्ड लिंकिंग लवकरात लवकर व्हायला हवे. आधार आणि पॅनमधील माहिती जुळत नसल्यामुळे अनेकांना लिंक करण्यात अडचणी येत आहेत. तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही.

आधार-पॅनचे फायदे

आधार कार्डच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो. वन नेशन वन रेशन कार्ड असो की पीएम किसान सन्मान निधी किंवा अंत्योदय अन्न योजना, या सर्व योजनांचा लाभ लोकांपर्यंत फक्त आधार कार्डद्वारेच पोहोचला आहे. त्याचबरोबर बँक, पेन्शन, रेल्वेसह अन्य सरकारी खात्यांमध्येही आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून केला जात आहे.

हेही वाचा :  Vodafone Idea च्या मदतीसाठी एअरटेल सरसावलं, ३००० कोटींचा केला करार!

दुसरीकडे, पॅन कार्ड मोठे आर्थिक व्यवहार करण्यासाठी आणि आयकर रिटर्न भरण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर बँकेकडून कर्ज घेण्यात पॅनकार्डचाही मोठा वाटा आहे. अशा स्थितीत ही दोन्ही कागदपत्रे अनेकदा रोजच्या कामात वापरली जातात.

ही माहिती जुळली पाहिजे

युनि आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नुसार, आधार कार्ड जारी करणारी संस्था, त्यात दिलेली माहिती जसे की जन्मतारीख, लिंग, नाव, वडील/पतीचे नाव पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी जुळले पाहिजे. यापैकी कोणतीही माहिती जुळत नसल्यास, तुमचा आधार आणि पॅन लिंक होणार नाही. तुमच्यासोबतही अशीच समस्या असेल, तर त्यासाठी तुम्हाला आधार किंवा पॅन कार्डपैकी एकामध्ये दिलेली चुकीची माहिती दुरुस्त करावी लागेल.

चूक सुधारण्यासाठी हे काम करा

पॅन किंवा आधारमध्ये काही चूक असल्यास ती दुरुस्त केली जाऊ शकते. पॅन कार्डमधील चूक सुधारण्यासाठी तुम्हाला onlineservices.nsdl या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. दुसरीकडे, आधार कार्डमधील चूक सुधारण्यासाठी, तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …