भाजपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने शिवसेना आमदाराची भाऊजयला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

भाजपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने शिवसेना आमदाराची भाऊजयला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण



भाजपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने शिवसेना आमदाराची भाऊजयला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

औरंगाबादमधील सटाणा येथे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते गुरुवारी भाजपा शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या चुलत भावाची पत्नी जयश्री दिलीप बोरनारे पतीसोबत हजर होत्या. यावेळी त्यांनी डॉ भागवत कराड व माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांचा सत्कार केला. मात्र हा सत्कार बोरनारे कुटुंबीयांच्या जिव्हारी लागला. हाच राग मनात धरून आमदार बोरनारे यांच्या कुटुंबीयांनी जयश्री बोरनारे यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केलं. तसंच शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

आमदार बोरनारे स्वतः या मारहाणीत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे जयश्री बोरनारे गोदावरी कॉलनीत एका नातेवाईकांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमात पतीसोबत सहभागी झाल्या होत्या. भर कार्यक्रमातच त्यांना बोरनारे कुटुंबातील १० जणांनी जबर मारहाण केली. त्यांच्या पतीलादेखील मारहाण करण्यात आली आहे.

यानंतर जयश्री बोरनारे यांनी पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार केल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून आपली फिर्याद दिली. जयश्री बोरनारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आमदार रमेश बोरनारे, त्यांचा भाऊ संजय नानासाहेब बोरनारे, दिपक बाबासाहेब बोरनारे, अजिंक्य संपत बोरनारे, रणजीत मधुकर चव्हाण, संपत नानासाहेब बोरनारे, अबोली संजय बोरनारे, वर्षा संजय बोरनारे, संगिता रमेश बोरनारे (सर्व रा.मुरारी पार्क वैजापूर) व दिनेश शाहु बोरनारे (रा.सटाणा) या १० जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :  मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला १२ वर्षे सक्तमजुरी; एक लाखाचा दंड

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरच्या माध्यमातून या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. “शिवरायांच्या महाराष्ट्रात वैजापूरचा शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी भाजपच्या कार्यक्रमाला का गेली? असं म्हणत महिलेला बेदम मारहाण केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु, कोणतीही कारवाई झाली नाही. उलट पिडीतेवरचं ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर महिलाधोरणकर्ते काही बोलणार का ? अजून किती बलात्कारी व महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना वाचवणार आहात?,” असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे. महाराज असते तर या सरकारचा कडेलोट केला असता. हे सरकार गोरगरीबांचं धार्जीणं नाही तर सरकारचे कलाकारी मंत्री आमदार खासदार व त्यांच्या बगलबच्चे धार्जीणं आहे, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

The post भाजपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने शिवसेना आमदाराची भाऊजयला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण appeared first on Loksatta.

हेही वाचा :  ठाणे रेल्वे स्टेशनवरील भार हलका होणार; मध्य रेल्वेवर उभारण्यात येणार नवे स्थानक



Source link