Samsung Galaxy s22 Ultra आणि Apple iphone 13 pro max पैकी कोणता फोन चांगला? जाणून घ्या

Samsung galaxy s22 ultra हा आयफोन १३ प्रो मॅक्सच्या बरोबरीला येतो. अशा परिस्थितीत यापैकी कोणता फोन खरेदी करणं योग्य आहे हे जर तुम्हाला कळत नसेल तर इथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

Samsung Galaxy ने यावर्षी S सीरीजचे नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉंच केले आहेत. यामध्ये अनेक स्मार्टफोन्स Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra सादर करण्यात आले आहेत. Samsung galaxy s22 ultra बद्दल बोलायचं झालं तर हा फोन कंपनीचा सर्वात खास आणि मोठा स्मार्टफोन आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, Samsung galaxy s22 ultra हा आयफोन १३ प्रो मॅक्सच्या बरोबरीला येतो. अशा परिस्थितीत यापैकी कोणता फोन खरेदी करणं योग्य आहे हे जर तुम्हाला कळत नसेल तर इथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

सॅमसंग आणि आयफोन डिस्प्ले
Samsung Galaxy S22 Ultra वरील डिस्प्ले १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.८ इंचाचा QHD+ डायनॅमिक AMOLED डिस्प्ले दाखवतो. दुसरीकडे iPhone 13 Pro Max वरील डिस्प्ले हा ६.७ इंचाचा सुपर रेटिना XDR प्रमोशन OLED डिस्प्ले आहे, जो १२० Hz पर्यंत रीफ्रेश रेट ऑफर करतो.

हेही वाचा :  दुकाने, सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका

आणखी वाचा : वनप्लस कंपनीच्या दोन नव्या स्मार्ट टीव्ही ‘या’ तारखेला होणार लॉंच, स्पेसिफिकेशन लीक

दोन्हीचे स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy S22 Ultra १२ GB पर्यंत RAM आणि १ TB अंतर्गत स्टोरेजसह लॉंच करण्यात आला आहे. यात ५,००० mAh बॅटरी आहे, ४५ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह. पुढे iPhone 13 Pro Max Apple मध्ये A15 बायोनिक चिप मिळते, जी एक नवीन ६ कोर CPU, ५ कोर GPU आणि १६ कोर न्यूरल इंजिन ऑफर करते. स्मार्टफोन ४,३५२ mAh बॅटरीसह हा स्मार्टफोन येतो, जो २० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

आणखी वाचा : Tinder वर आता ३० ते ४९ वयोगटातील लोकांसाठी चार्ज कमी होणार

कॅमेरा
Samsung Galaxy S22 Ultra क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह लॉंच करण्यात आला आहे, ज्यामध्ये १०८ MP वाइड अँगल लेन्स, १२ MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि दोन १० MP टेलिफोटो शूटर आहेत. समोर Samsung Galaxy S22 Ultra 40MP शूटरसह येतो. दुसरीकडे, iPhone 13 Pro Max मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये १२ MP टेलिफोटो लेन्स, १२ MP वाइड अँगल लेन्स आणि १२ MP अल्ट्रा-वाइड अँगल शूटरचा समावेश आहे. Apple iPhone 13 Pro Max 12MP TrueDepth कॅमेरा सेल्फीसाठी देण्यात आला आहे.

हेही वाचा :  विश्लेषण : यूपी दुसऱ्या टप्प्यात मतदानावर समाजवादी पक्षाची भिस्त का?

डिझाईन
या दोन्ही डिव्हाईसच्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर, Samsung Galaxy S22 Ultra हा इन-बिल्ट एस पेन स्लॉटसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन आता सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 सारखा दिसतो, जो २०२० मध्ये लॉंच झाला होता. हे क्वाड रियर कॅमेरे आणि होल-पंच फ्रंट पॅनेलसह येतं. दुसरीकडे, आयफोन 13 प्रो मॅक्समध्ये स्क्वेअर-आकाराचा कॅमेरा मॉड्यूल आहे, जो एक आकर्षक लुक देतो. यात ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. Samsung Galaxy S22 अल्ट्रा-वक्र डिस्प्लेसह येतो, तर iPhone 13 Pro Max सपाट-एज्ड डिस्प्लेसह येतो.

आणखी वाचा : OnePlus Nord 2 CE Lite 5G चे स्पेसिफिकेशन लीक झाले, जाणून घ्या सविस्तर…

किंमत
जर तुम्ही Samsung Galaxy S22 Ultra बद्दल बोलायचं झालं तर तो ९४,९९० रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. दुसरीकडे, Apple iPhone 13 Pro Max बद्दल बोलायचं झालं तर ते १,२९,९०० रुपयांच्या किंमतीसह १२८ GB स्टोरेज ऑफर करते. पण आपण यावर एक्सचेंज ऑफर देखील घेऊ शकता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …