New Year 2023 : यंदाचं वर्ष ‘दुष्काळात तेरावा महिना’, कसं ते जाणून घ्या

Adhik Maas 2023: नवं वर्ष सुरू होण्यास अगदी काहीच दिवस उरलेत. ज्योतिष्यांच्या मते, 2023 हे वर्ष फार खास असणार आहे. हिंदू पंचांगानुसार, येणारं नवं वर्ष 12 नाही तर 13 वर्षांचं असणार आहे. या वर्षात महादेवाचा श्रावण महिना (Shravan month) एक नाही तर दोन महिने असणार आहे. तसेच वर्षातून एक दोन वेळा जे मिळेल त्यावरच पुढील बारा महिने गुजराण करावी लागत असे. अशा काळात ज्या वर्षात तेरावा महिना म्हणजे अधिकचा महिना येई तेंव्हा ओढाताण व्हायची. यावरूनच ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी म्हण पडली. 

अधिक मासामुळे (adhik mas) हे घडणार असून याला मलमास असेही म्हणतात. ज्योतिष्यांच्या मते, अधिकमासामुळे तब्बल 19 वर्षानंतर श्रावण दोन महिने असणार आहे.

कधीपासून कधी पर्यंत असेल अधिक मास?

2023 मध्ये अधिकमास 18 जुलैपासून सुरू होईल तर 16 ऑगस्ट 2023 पर्यंत असेल. या महिन्याला भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना म्हटलं जातं. हा महिना श्रावण महिन्यातच सुरू होणार असल्याने महादेवाची भक्ती करणाऱ्यांना अधिक वेळ मिळणार आहे.

हेही वाचा :  Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या लेकीचा VIDEO व्हायरल, आजारी असतानाही मुंडे मुलीला म्हणतात...

काय असते मलमास?

हिंदू कॅलेंडरनुसार (Hindu calendar) प्रत्येक तीन वर्षांनी एक अतिरिक्त महिना जुळून येतो ज्याला अधिकमास किंवा मलमास किंवा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. सूर्य वर्ष 65 दिवस आणि 6 तास असते. तर चंद्र वर्ष 354 दिवसांचं मानल्या जातं. दोन्ही वर्षांमध्ये जवळपास 11 दिवसांचा फरक आहे. प्रत्येक वर्षी कमी होणाऱ्या या 11 दिवसांना जोडल्यास एक महिना होतो. याच अंतराला सुरळीत करण्यासाठी दर तीन वर्षांनी चंद्र मास अस्तित्वात येते. ज्याला अधिकमास असं म्हणतात.

वाचा : वर्ष संपण्यापूर्वी उरकून घ्या ‘ही’ काम, 1 जानेवारीपासून तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

अधिकमासात चुकूनही करू नका या चुका

लग्न – अधिक मासात लग्न करणं अशुभ मानल्या जातं. या काळात लग्न केल्यास ना तुम्हाला भौतिक सुख मिळणार ना तुम्हाला शारीरिक सुख मिळणार. पती पत्नीत भांडणं होतील.

नव्या दुकानाचं काम – अधिकमासात नवा व्यवसाय सुरू करू नका. मलमासात नवा व्यवसाय सुरू केल्यास तुम्हाला अनेक आर्थिक अडचणी येतील.

इमारतीचे बांधकाम – अधिकमासात नव्या इमारतीचं बांधकाम करू नये. या काळात बनवलेल्या घरांत सुख शांतीचा भंग होतो.

हेही वाचा :  'झिरो ते हिरो'... 'Nana Patekar' अभिनयाचा हुकुमी एक्का

शुभ कार्य करू नये – कुठलेही मंगल कार्य जसे की कर्णवेध, मुंडन अशुभ मानल्या जातं. या काळात इमारतीचे किंवा कुठलेही काम केल्यास नात्यातला गोडवा कमी होतो. 

अधिक महिना म्हणून साधारणतः श्रावण, ज्येष्ठ आणि आषाढ हे महिने बहुतांशदा येत असतात. एकदा एखादा महिना अधिक आला की पुन्हा 19 वर्षांनी तो महिना अधिक होतो असे सर्वसामान्यपणे आढळते. परंतु श्रावण आणि ज्येष्ठ महिन्यांच्या बाबतीत ही वेळ 11 वर्षांनी व त्यानंतर लगेच 8 वर्षांनीही येऊ शकते. 1980 नंतर लगेच 1988 साली ज्येष्ठ महिना अधिक आला होता. त्यानंतर 11 वर्षांनी 1999 साली तो पुन्हा अधिक महिना म्हणून आला. तेव्हापासून एक आड एक आठ आणि अकरा वर्षांनी अधिक होण्याचा मान त्याला मिळत आहे. हा क्रम 2045 पर्यंत चालू राहील.   



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …