Elon Musk वर ही काय वेळ आली? ट्विटरवर ताबा मिळवताच श्रीमंती निघून गेली

Elon musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलन मस्कची ओळख होती. पण जेव्हा ट्विटरची मालकी घेतल्यापासून सातत्याने चर्चेत असलेले एलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण एलन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत माणूस राहिला नाही. ट्विटरचे मालक एलन मस्क यांना लुई व्हिटॉनचे बॉस बर्नार्ड अर्नॉल्ट (Louis Vuitton boss Bernard Arnault) यांनी श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. (Elon Musk Is Now The World’s Second Richest Man)

सोमवारपासून ट्विटरने ब्लू सब्सक्रिप्शनचे पॅकेज लॉन्च केले. त्यानुसार, ट्विटरचे ब्लू सब्सक्रिप्शन प्रति महिना 8 डॉलर असेल. तसेच, अॅपल iOSसाठी प्रति महिना 11 डॉलर असेल. यावेळी ट्विटरद्वारे युझर्सच्या खात्यांची अधिक सखोल पडताळणी केली जाणार असून, अधिकृत युझर्सनाच ही सेवा मिळणार आहे. या सेवेसाठी ट्विटरचे कर्मचारी स्वत:च्या अकाऊंटचीही पडताळणी करणार आहे. त्याचदरम्यान मस्कची कंपनी टेस्ला स्टॉक सोमवारी $6.87 किंवा 4.09% खाली $160.95 वर बंद झाला. 

शेअर्सच्या किमतीत घसरण झाल्यामुळे मस्कची नेटवर्थ घसरली आहे. दुसरीकडे, जर आपण या संपूर्ण वर्षाबद्दल बोललो तर, आतापर्यंत टेस्कचा हिस्सा 158.55 किंवा 49.62% कमी झाला आहे. म्हणजेच जवळपास निम्मे झाले आहे. ऑगस्टमध्ये, मस्कने त्याच्या ट्विटर संपादनासाठी निधी देण्यासाठी टेस्लाचे सुमारे $7 अब्ज किमतीचे शेअर्स विकले.  

हेही वाचा :  Petrol Diesel Price Today : आताच भरून घ्या पेट्रोल- डिझेल; Weekend साठी बाहेर जाण्याआधी पाहा नवे दर

वाचा : Twitter चं रुपडं पालटलं; PM Modi यांच्यामागोमाग तुमच्याही अकाउंटमध्ये झाले असतील ‘हे’ बदल  

मस्क यांची एकूण संपत्ती 13.5 लाख कोटी रुपये

ब्लूमबर्गच्या मते, अरनॉल्टची यांची एकूण संपत्ती आता $171 अब्ज (सुमारे 14.12 लाख कोटी रुपये) आहे, तर एलन मस्क यांची एकूण संपत्ती $164 अब्ज (सुमारे 13.5 लाख कोटी रुपये) आहे. भारतीय अब्जाधीश गौतम अदानी $125 अब्ज (सुमारे 10.32 लाख कोटी) संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांचा क्रमांक लागतो. दोघांची एकूण संपत्ती 116 अब्ज डॉलर (सुमारे 9.5 लाख कोटी रुपये) आहे. मुकेश अंबानी $89.7 अब्ज (सुमारे 7.41 लाख कोटी) सह 9व्या स्थानावर आहेत.

दरम्यान मस्कची दुसऱ्या स्थानावर घसरण मंगळवारी टेस्ला समभागांच्या घसरणीशी जोडली जात आहे. ईव्ही निर्माता टेस्लाचे शेअर्स न्यू यॉर्कमध्ये 6.5 टक्क्यांनी घसरून 156.91 डॉलरवर आले. त्यामुळे त्याचे मार्केट कॅप 500 बिलियन डॉलरच्या खाली घसरले, असा ब्लूमबर्गने अहवाल दिला.

मस्क यांनी सोमवारी टेस्लाचे 700 कोटी रुपयांचे शेअर्स गमावले. परिणामी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले नाहीत. फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट यांनी मस्क यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरली आहे. मस्कने टेस्ला शेअर्समध्ये सुमारे 7.4 अब्ज (सुमारे 700 कोटी) गमावले आणि यासह, LVMH सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी जगातील रियल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत आपले स्थान व्यापले.

हेही वाचा :  मोबाईल चार्जरने केला घात, मध्यरात्री आई-मुलाचा घेतला जीव; मन हादरवणारी घटना



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक…; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीका

Sharad Pawar: शुक्रवारी लोकसभेच्या निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला. तर दुसरीकडे उर्वरित टप्प्यांसाठी प्रत्येक पक्षाकडून …

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …