लालूप्रसाद यादवांचा जावई थाट! मेहुणा स्वागताला न आल्याने नाराज; गाडीतून खाली उतरण्यास नकार

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव राजकारणात आपल्या मजेशीर अंदाजामुळे ओळखले जातात. दरम्यान, लालूप्रसाद यादव नुकतेच आपल्या सासरी पोहोचले होते. यावेळी पुन्हा एकदा त्यांच्या स्वभावाची चुणूक पाहण्यास मिळाली. मेहुणा स्वागताला न आल्याने नाराज झालेल्या लालूप्रसाद यादव यांनी गाडीतून खाली उतरण्यास नकार दिला. यानंतर राबडी देवी (Rabdi Devi) यांच्या कुटुंबीयांची एकच धावपळ सुरु झाली. अखेर राबडी देवीच्या भावाने आणि कुटुंबाने हात जोडून विनवणी केली असता ते खाली उतरले. यावेळी गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. 

लालूप्रसाद यादव तब्बल 7 वर्षानंतर त्यांच्या मूळ गावी फुलवारिया येथे पोहोचले होते. तसंच 10 वर्षांनंतर सासरच्या घऱी गेले होते. सेलार कला गावात जावई लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी गाडीतच बसले होते. काही मिनिटांनी राबडी देवी यांच्या माहेरच्या महिला आल्या आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन गेल्या. 

राबडडी देवी यांच्यासह त्यांचे मोठे सुपूत्र प्रताप यादवही निघून गेले. पण लालूप्रसाद अद्यापही गाडीतच बसलेले होते. कारण आपल्या स्वागतासाठी कोणीही आलं नाही यामुळे ते नाराज झाले होते. जोपर्यंत आपला मेहुणा स्वागताला येत नाही तोवर लालूप्रसाद यादव तसेच बसून राहिले होते. 

हेही वाचा :  'राम माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले, 22 तारखेला मी अयोध्येला येणार नाही! हे सगळं ढोंग..'

दरम्यान, आपल्या गावातील जावई नाराज झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांच्या गाडीभोवती गावकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. दुसरीकडे लालू नाराज झाल्याची खबर मिळताच त्यांचा मेहुणा रमाकांत यादव धावत भावोजींच्या गाडीजवळ पोहोचला. यानंतर त्याने लालूप्रसाद यांच्यासमोर हात जोडून त्यांना मनवण्यास सुरुवात केली. 

अखेर काही वेळाने लालूप्रसाद यादव यांनी राग सोडला आणि आपल्या सासरी जाण्यास तयार झाले. पण यावेळीही त्यांचे मेहुणे प्रभूनाथ यादव, साधू यादव आणि सुभाष यादव हे तिघे भाऊ उपस्थित नव्हते. 

लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी जवळपास 45 मिनिटं सेलार कलामधील आपल्या घरात थांबले होते. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी लोकांची भेट घेतली. नंतर राबडी देवी यांच्या नावे उभारण्यात आलेल्या प्लस टू शाळेच्या निरीक्षणासाठी निघून गेले. पण यावेळी लालूप्रसाद यादव यांच्या नाराजीची चांगलीच चर्चा रंगली.

हेही वाचा :  ब्रॉयफ्रेंडसोबत पळून जात होती बायको, नवऱ्याला खबर लागताच दोघांना घडवली जन्मभराची अद्दल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘धुम्रपान न करणारे Losers…’, तरुणीची पोस्ट पाहून डॉक्टरने फटकारलं, ‘माझी सर्वात तरुण रुग्ण…’

धुम्रपान करणं ही आजकाल काहींसाठी फॅशन झाली आहे. मित्र किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या घोळक्यात एका हातात …

हायवेवर ट्रकचालकाच्या चुकीमुळे एकाच कुटुंबातील 6 जण जागीच ठार; CCTV त कैद झाला थरार

रस्त्यावर वाहन चालवताना एक चूक आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालते. त्यामुळेच वाहन चालवताना योग्य खबरदारी …