मालिका सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाला धडकी भरली; भारताच्या स्टार खेळाडूची वाटतेय भीती

नवी दिल्ली: आशिया कपची सुरूवात २७ ऑगस्ट रोजी झाली होती. भारताची पहिली लढत २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार होती. खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीला आशिया कपच्या आधी विश्रांती देण्यात आली होती. विराट धावा करण्यात अपयशी ठरत होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शून्यावरच स्लिपमध्ये त्याचा कॅच सुटला. त्यानंतर विराटने अवघड परिस्थितीत ३५ धावा केल्या आणि भारताने ती लढत अखेरच्या षटकात जिंकली.

पाकिस्तानविरुद्ध झालेल्या या लढतीनंतर ११ दिवसांनी विराटने ८ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध सलामीला येत शतक झळकावले. हा सामना सुरू होण्याआधी भारत स्पर्धेतून बाहेर झाला होता आणि कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. विराटने त्याच्या नैसर्गिक खेळानुसार धमाकेदार फलंदाजी केली. त्याने नाबाद १२२ धावा केल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून झालेली ही सर्वात मोठी खेळी ठरली. त्याआधी हाँगकाँगविरुद्ध आणि पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-४ मध्ये विराटने अर्धशतक केले होते.

वाचा- BCCIमधून गांगुलीचा पत्ता कट होणार; या व्यक्तीला अध्यक्ष करण्याची जोरदार तयारी

आशिया कपमधील या कामगिरीचा विराटला आयसीसीच्या क्रमवारीत फायदा झाला. ३३व्या क्रमांकावर असलेला विराट थेट १५व्या क्रमांकावर आला. १२ दिवसात विराटने १८ स्थानांची उडी घेतली.

वाचा- मुंबई इंडियन्समध्ये झाला मोठा बदल, महेला जयवर्धनेची जागा घेणार हा माजी खेळाडू

आता ऑस्ट्रेलियाचा नंबर…

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० सप्टेंबरपासून ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. विराट कोहलीला फॉर्म गवसला आहे आणि त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या १९ टी-२० सामन्यात ६०च्या सरासरीने धावा केल्या आहेत. टी-२० चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध सर्वात मोठा धोका विराट कोहलीपासूनच आहे.

वाचा- विराटने दिले जगातील आघाडीच्या १५ जणांना ओपन चॅलेंज; मी येतोय, वर्ल्डकपसाठी…

दोन्ही संघातील पहिली टी-२० मॅच मोहाली येथे होणार आहे. याच मैदानावर २०१६च्या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीमुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता आणि ते स्पर्धेबाहेर झाले होते. तेव्हा विराटने ५१ चेंडूत ८२ धावा केल्या होत्या. टी-२० मधील विराटची ती एक सर्वोत्तम खेळी मानली जाते.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सौरव गांगुलीकडे लवकरच मोठी जबाबदारी? ICC अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुलीचं नाव?

मुंबई, 25 सप्टेंबर: काल सुप्रीम कोर्टानं ग्रीन सिग्नल दिल्यानं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव …

T 20 world cup : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वाईट बातमी, चाहत्यांना सामना पाहता येणार नाही

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार आता ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाहायला मिळणार आहे. हा …