माझी कहाणी : नवरा गेला अनं होत्याचं नव्हतं झालं, बाबा कुठे आहे मुलाच्या निष्पाप प्रश्नांना कसं देऊ उत्तर?​​

काही दिवसांपूर्वी मी माझ्या पतीला गमावले. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट दिवस होता. माझा नवरा जावून एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी मी अजूनही या धक्क्यातून बाहेर आलेले नाही. खरे सांगायचे तर माझ्या आयुष्यात आता आनंद उरला नाही. माझ्या आयुष्या फक्त दु:ख उरले आहे. कारण आता एक चांगली आई होण्यासोबतच मला एक चांगले वडीलही व्हायचे आहे. माझ्या पदरात एक लहान मुल देखील आहे. मला फक्त माझ्या रागावर नियंत्रण ठेवायचे नाही तर माझ्या मुलासाठी मोकळेपणाने जगायचे आहे. मला कळत नाही आहे मी काय करु. (सर्व प्रतिमा सूचक आहेत, आम्ही वापरकर्त्यांनी शेअर केलेल्या कथांमधील त्यांच्या ओळखीचे संरक्षण करतो) (फोटो सौजन्य : istock)

​मी त्याला सूटकेसला मिठी मारताना पाहिले

ही गोष्ट 6 डिसेंबर 2021 ची आहे. त्या काळरात्री माझ्या पतीने संध्याकाळी 4.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून माझ्या पाय खालील जमिनच सरकली. तो आपल्याला सोडून निघून गेला पण त्याच्या जाण्यानंतर मी रोज मरण यातना भोगत आहे. इतकंच नाही तर या प्रसंगातून बाहेर पडणं मला अधिक कठीण झालं, जेव्हा माझं मुल मला विचारायचं, ‘पप्पा देवाकडे गेले आहेत, तेव्हा त्यांनी त्यांची सुटकेस सोबत का घेतली नाही’. त्याचे असे निरागस प्रश्नांमुळे मला खूप त्रास होतो. त्याचा कोणत्याच प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे नसते.

हेही वाचा :  नमिता मुंदडा २ महिन्यांच्या बाळासह विधानभवनात, वर्किंग वुमनची ‘हिरकणी’

​मुलाकडे पाहून दु:ख विसरते

माझा मुलगा फक्त दोन वर्षांचा आहे. त्याला त्याच्या वडिलांबद्दल काहीच माहिती नाही. तरीही त्याने मला माझ्या नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत केली आहे. त्याचा चेहरा पाहिल्यावर मी माझे अश्रू पुसते आणि स्वत:ला दिलासा देते. कुणीतरी अगदी बरोबरच म्हटलंय की, आपली व्यक्ती गमावल्याचं दु:ख खूप मोठ असतं या दु:खाकडे दुर्लक्ष करता येत नाही. कामाचा गडबडीमध्ये आपण आपले दु:ख विसरतो पण मनात त्या वेदना तशाच राहतात.

​तो बाबा बाबा ओरडू लागला

एके दिवशी मी माझ्या मुलासोबत मॉलमध्ये गेले होते. तिथे त्याला एक माणूस भेटला जो त्याच्या वडिलांसारखाच दिसत होता. त्या व्यक्तीला बघून माझा मुलगा त्याच्या मागे धावला आणि बाबा बाबा ओरडू लागला. मी त्याला कसे तरी हाताळले, पण या घटनेनंतर त्याने ‘बाबा परत आणा’ ‘माझा बाबा कुठे आहे’ असा सूर पकडला. तो 20 मिनिटे सतत रडत होता, पण त्यानंतर तो म्हणाला, ‘बाबा गेल्याचे मला वाईट वाटते. बाबा आता माझ्या सोबत हवा होता त्याच्या या बोलण्याने माझे दु:ख अनेक पटींनी वाढले. (वाचा :- माझी कहाणी: माझ्याकडे ती एक गोष्ट नाही म्हणून माझी पत्नी मला डोळ्यासमोर उभं करत नाही, काय करु?)

हेही वाचा :  नीता अंबानींपेक्षाही सुंदर आहे त्यांची विहीणबाई, राधिकाच्या मेहंदीत रॉयल अंदाज दाखवत केली थेट अंबानींशी बरोबरी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …