कल्पनाही करु शकत नाही असं घडलं, पाळीव कुत्रा निमित्त ठरला… बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू

Dombivali News : कुणी कल्पनाही करु शकत नाही अशी भयानक घटना बहिण भावासह घडली आहे. त्यांचा पाळीव कुत्रा मृत्यूच निमित्त ठरला आहे. तलावात बुडून बहिणी भावाचा दुर्दैवी अंत झाला आहे. डोंबिवलीत ही धक्कादायक घटना घडली आहे. दोघेही भावंड उच्च शिक्षण घेत होते. दोघेही अभ्यासात खूप हुशार होते (Dombivali News). 

डोंबिवली पूर्व येथील दावडी परिसरात ही घटना घडली आहे. येथील तलावात भाऊ बहिणीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कीर्ती रवींद्रन आणि रणजित रवींद्रन असं मृत्यू झालेल्या या दोघा भाऊ बहिणीचे नाव आहेत.

काय घडलं नेमकं?

डोंबिवली पूर्वेकडील दावडी परिसरात ही हृदयद्रावक घटना घडलीय. दोघेही डोंबिवली पश्चिम महाराष्ट्र नगर मधील रहिवासी आहेत. हे दोघे भाऊ बहिण या तलावात आपल्या पाळीव कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी आले होते. त्यावेळेस खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. 

हेही वाचा :  कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरात पुन्हा होणार बदल; NTAGIने केली महत्त्वाची शिफारस | reducing the duration of the second dose of Covishield vaccine to 8-16 weeks after the 1st dose- vsk 98

दोन तासानंतर मृतदेह सापडले

पोलिस आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी तब्बल दोन तास शोधकार्य करून या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. कीर्तीचा नुकताच अकरावीचा रिझल्ट लागला होता. किर्तीला 98 टक्के मार्क मिळाले होते. तर, रणजीत हा एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. या दोघांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

तलावाच्या शेजारी मानवी कवटी, पायांची हाडं आणि कपडे सापडल्याने खळबळ

लातूरच्या लेंडेगावात एका पाझर तलावाच्या शेजारी मानवी कवटी, पायांची हाडं आणि कपडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. तलावात काही मुले पोहण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. गावातीलच एक तरुण चार महिन्यापासून बेपत्ता आहे. त्याचाच हा सांगाडा असावा असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

पोहायला गेलेला  तरुण पाण्यात बुडून बेपत्ता

हिंगोलीत पोहायला गेलेला एक तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाला आहे. कळमनुरी तालुक्यातील बोथी तलावात ही दुर्घटना घडली आहे. दीपक मारकळ असं या 20 वर्षीय तरुणाचं नाव आहे. 27 मे रोजी दुपारी ही घटना घडली. संध्याकाळी अंधार पडेपर्यंत आखाडा बाळापूर पोलीस आणि गावकरी तरुणाचा शोध घेत होते.  

हेही वाचा :  उद्धव ठाकरेंच्या बहिणीची राजकारणात एंन्ट्री; भाजपने भुंकण्यासाठी श्वान पथकाची नियुक्ती केल्याचा ताईंचा घणाघात



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा …

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …