कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरात पुन्हा होणार बदल; NTAGIने केली महत्त्वाची शिफारस | reducing the duration of the second dose of Covishield vaccine to 8-16 weeks after the 1st dose- vsk 98

१३ मे २०२१ रोजी एनटीएजीआयच्या शिफारशींनुसारच कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं होतं.

जगभरात पसरलेल्या करोना महामारीवर बऱ्याच अंशी नियंत्रण आणण्यात लसीकरणामुळे यश आलं आहे. भारतात बहुतांश लोकांना कोवॅक्सिन, कोविशिल्ड तसंच स्पुटनिक या लसी देण्यात आल्या. मात्र आता कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधलं अंतर कमी करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. NTAGI ने याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे.

कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस हा आता आठ ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. एनटीएजीआयनं हा सल्ला दिल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. त्यामुळे आता कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सध्या कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस हा बारा ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जातो. आता हे अंतर आणखी कमी केल्यास करोना लसीकरणालाही वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस हा २८ दिवसांनंतर दिला जातो. १३ मे २०२१ रोजी एनटीएजीआयच्या शिफारशींनुसारच कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं होतं. सहा ते आठ आठवड्यांच्या अंतरावरुन हे अंतर बारा ते सोळा आठवडे इतकं वाढवण्यात आलं होतं. आतापर्यंत देशातील सात कोटी जनतेने कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेले आहेत.

हेही वाचा :  तुम्ही वेगवेगळ्या नावाने परीक्षा दिली? IAS पूजा खेडकर अखेर सविस्तर बोलल्या, 'असा कोणता व्यक्ती...'

Source link