नमिता मुंदडा २ महिन्यांच्या बाळासह विधानभवनात, वर्किंग वुमनची ‘हिरकणी’

आमदार नमिता मुंदडा आपल्या दोन महिन्याच्या चिमुकल्या जीवासह मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानभवनात दाखल झाल्या आणि सर्वांचेच लक्ष त्यांनी वेधून घेतले. खरं तर नमिता मुंदडा यांच्याकडे पाहिल्यानंतर हिरकणीचीच आठवण आली. यावेळी ‘हिरकणी कक्ष’ चांगला असल्यानेच हे पाऊल उचलता आलं असं त्यांनी म्हटलं आहे.

नमिता मुंदडा या जनतेच्या सेवक आहेत. पण अशा अनेक महिला आहेत, ज्यांना मुलांना जन्म दिल्यानंतर त्वरीत कामावर हजर व्हावे लागते. मग पालकत्व नक्की कसे हाताळावे यामध्ये संतुलन राहात नाही. खरं तर हा एक हिरकणीचा धडाच सर्व वर्किंग वुमन गिरवत असल्याचे दिसून येत आहे. (फोटो सौजन्य – @mundadanamita Instagram)

बाळाला कसे सांभाळावे

बाळाला कसे सांभाळावे

बाळाला किमान पहिले सहा महिने स्तनपान असो अथवा कोणतेही काम असो आईच लागते. मात्र सध्या धकाधकीच्या जीवनात नोकरी अथवा काम करणेही तितकेच महत्त्वाचे ठरतेय. मग अशावेळी अनेक आईंसाठी पालकत्व आणि नोकरी दोन्ही संतुलन ठेवताना त्रासदायक ठरते. त्यामुळे अनेक ठिकाणी कार्यालयातच पाळणाघरही सुरू करण्यात आल्याचे ऐकिवात आहे.

हेही वाचा :  '...तरी अनेक अडचणी'; अजित पवारांसह सत्तेत असतानाही धनंजय मुंडे असं का म्हणाले?

वर्किंग वुमनची होणारी घुसमट

वर्किंग वुमनची होणारी घुसमट

आई झाल्यानंतर बाळाला पूर्ण वेळ देता येत नाही आणि बाळाचा सांभाळ योग्य हवा तर नोकरी सांभाळणेही गरजेचे आहे अशी अनेक नवजात मातांची घुसमट असते. याचे संतुलन ठेवताना सर्वात जास्त त्रास होतो तो आईला. ही वर्किंग वुमनची होणारी घुसमट मोडीत काढताना अनेक महिला दिसत आहेत आणि त्यातच नमिता मुंदडांचेदेखील नाव घ्यावे लागेल.

(वाचा – मुलाच्या मृत्यूनंतर खचले होते सतीश कौशिक, वयाच्या ५६ व्या वर्षी झाले सरोगसीद्वारे मुलीचे पिता)

आदर्श आई

आदर्श आई

बाळाला घेऊन कामकाज करता येते हे अनेक महिलांना आतापर्यंत दाखवून दिले आहे. एक तर चूल सांभाळ किंवा काम कर असा आजही अनेकांकडे दृष्टीकोन दिसून येतो. मात्र बाळाला जन्म दिल्यानंतर कामकाज न थांबवता त्याचे योग्य पालकत्व सांभाळता येते हेच नमिता मुंदडासारख्या कणखर महिलांनी आतापर्यंत दाखवून दिले आहे.

(वाचा – C-Section सर्जरीतून लवकर जखम बरी व्हावी वाटत असेल तर बाळंतिणींनी या ५ सोप्या टिप्स करा फॉलो)

बाळासाठी सोयीसुविधांचीही गरज

बाळासाठी सोयीसुविधांचीही गरज

कंपनीसाठी काम करत असलो अथवा जनतेचा सेवेकरी असलो तरीही एका ठराविक वेळी प्रत्येकाला आपल्या बाळासाठी योग्य सोयीसुविधांची गरज लागतेच आणि यावेळी नमिता मुंदडांच्या बाळासह उपस्थितीमुळे पुन्हा एकदा ही गोष्ट लक्षात आली आहे. विधानभवनात योग्य सोय असल्यामुळेच निर्धास्तपणे बाळाला घेऊन येणे शक्य होते. मात्र पालकत्व सांभाळणाऱ्या प्रत्येक आईला अशी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या तर तिलाही त्रास होणार नाही.

हेही वाचा :  संतापजनक! बनियान - टॉवेलमध्येच पोलीस अधिकाऱ्यानं महिलांसमोर...Video Viral

(वाचा – Ovulation Period म्हणजे काय? आई होण्यापूर्वी जाणून घेणे का गरजेचे)

पालक आणि करिअरचा समतोल

पालक आणि करिअरचा समतोल

आजकालची महिला आई आणि करिअर या दोन्हीचा समतोल योग्य पद्धतीने सांभाळू शकते. सर्वच आघाड्यांवर महिला पुढे आहेत. नमिता मुंदडांनी आपल्या मुलीला सोबत घेऊनच हाऊसमध्ये काम केले. यावरूनच आजकाल महिला दोन्हीचा समतोल किती व्यवस्थित राखत आहेत हे दिसून येत आहे.
पालकत्व म्हणजे केवळ मुलांना घरात बसून घडविणे नाही तर स्वतःचे करिअर सांभाळत मुलांना योग्य पद्धतीने सांभाळणे आणि वाढवणे हेच हल्ली महिला सिद्ध करून दाखवत आहेत.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …

अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

Ajit Pawar Violated Traffic Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आलं …