महेश मांजरेकरांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमातून काढता पाय घेतला का?

मुंबई- सावरकर या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शक म्हणून सिनेमा सोडल्याची अफवा आहे. रणदीप हुड्डा, जो मुख्य भूमिकेत आहे, तोच आता या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ई-टाइम्सने चित्रपट निर्मात्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

कोण आहे देव चित्रगुप्त, ज्यांच्या अपमानामुळे ‘थँक गॉड’ होतोय बॉयकॉट

मांजरेकर यांनी मार्चमध्ये या प्रोजेक्टची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी वीर सावरकर जयंतीनिमित्त सोशल मीडियावर एक मोशन पोस्टरही शेअर केले होते. त्याला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले होते की, ‘रणदीप हुड्डा सादर करत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर मोशन पोस्टर. तुम्हा सर्वांना वीर सावरकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा! लोकांच्या मनात सावरकरांच्या वेगवेगळ्या प्रतीमा असू शकतात पण एक चित्रपट निर्माता म्हणून सावरकरांचा जो विचार होता मी तोच विचार जुळवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा आणि पात्र यात सावरकर प्रत्यक्षात काय होते यात कोणताही फरक होणार नाही. ते स्वातंत्र्यसैनिकच होते आणि त्यांना विसरता येणार नाही.’


महेश मांजरेकरांच्या आगामी दिग्दर्शित सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर व्हाईट, हिंदी-मराठी द्विभाषिक, वीर दौडले सात चित्रपट आणि नुकताच जाहीर केलेला निरावधीचा समावेश आहे. याशिवाय ते बिग बॉस मराठीचा चौथा सीझन होस्ट करणार आहे.

प्रसाद ओक करणार प्रार्थना बेहेरे आणि स्वप्नील जोशीची सुटका



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या …

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …