कोल्हापूरकरांचा नादच खुळा! गृहिणी घरी नेणार केबीसी १४ चा पहिलावहिला कोट्यवधींचा चेक

मुंबई : छोट्या पडद्यावर प्रसारित होणाऱ्या कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाचं १४ वं पर्व (Kaun Banega Crorepati) सध्या लोकप्रियता मिळवत आहे. दरम्यान या पर्वातील पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या कविता चावला यांनी एक कोटी रुपये जिंकले असून आहे. गृहिणी असलेल्या कविता याचं खुद्द अमिताभ बच्चन यांनी देखील भरभरून कौतुक केलं आहे. कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी आगामी भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कविता चावला ठरल्या १४ व्या पर्वाच्या पहिल्या करोडपती

केबीसी १४ च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर आगामी कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. त्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन अत्यंत उत्साहानं एक कोटी! असं ओरडताना दिसत आहेत. त्याबरोबर हॉटसीटवर बसलेल्या कविता देखील अतिशय आनंदित होता. कविता यांनी एक कोटी रुपये जिंकल्याच्या आनंदात सेटवर असलेले प्रेक्षकही उभे राहून टाळ्यांच्या कडकडाट कविता याचं अभिनंदन करताना दिसत आहे.

हे वाचा-एक दिवस सुट्टी घ्या सर… वाढदिवशी शाहरुख खानने पंतप्रधान मोदींना दिला असा सल्ला

त्यानंतर बिग बी कविता यांच्यासमोर साडेसात कोटी रुपयांसाठी १७ वा प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रोमोत कविता यांना या १७ व्या प्रश्नाचं उत्तर देता आलं की नाही हे कळत नाही. परंतु कार्यक्रमाच्या पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या भागामध्ये या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना नक्की मिळेल.


हे वाचा-राम, कृष्ण आणि गांधींप्रमाणे तुम्ही… कंगनाची पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी खास पोस्ट
कविता चावला यांनी एक कोटी रुपये जिंकल्याचा हा प्रोमो शेअर करत निर्मात्यांनी लिहिलं आहे की, ‘गृहिणी असलेल्या कविता चावला यांनी एक कोटी रुपये जिंकत केबीसीच्या १४ व्या पर्वात एक नवीन इतिहास रचला आहे. बघत रहा कौन बनेगा करोडपती, येत्या सोमवार आणि मंगळवारी…’ कविता चावला याचं वैशिष्ट्य म्हणजे याआधीही त्या ‘कौन बनेगा करोडपती शो’मध्ये पोहोचल्या होत्या. परंतु त्यांना हॉटसीटपर्यंत पोहोचता आलं नव्हतं. मात्र निराश न होता त्यांनी पुन्हा जोमानं प्रयत्न केले आणि पुन्हा त्या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या. इतकंच नाही तर हॉटसीटवर जात त्यांनी एक कोटी रुपये देखील जिंकले!



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …