AIIMS मध्ये नोकरीची उत्तम संधी! पदभरतीचा तपशील जाणून घ्या

AIIMS Recruitment 2023: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने वरिष्ठ निवासी पदांच्या भरतीसाठी (AIIMS Job 2023) नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. या भरतीद्वारे एकूण ११४ पदे भरली जाणार आहेत. वरिष्ठ रहिवाशांच्या पदांवर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट aiimsjodhpur.edu.in वर जाऊन अर्ज करु शकतात. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ निवासी पदांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. सर्व विभागातील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे देण्यात आली आहे.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

NCDC: राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळात नोकरीची संधी, ५० हजारपर्यंत मिळेल पगार

अर्ज शुल्क

सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १ हजार रुपये भरावे लागतील तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ८०० रुपये भरावे लागतील. तथापि, पीडब्ल्यूबीडी श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

हेही वाचा :  ऑक्टोबरमध्ये २१,५०० तरुणांना मिळाल्या नोकऱ्या

पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पगार

वरिष्ठ निवासी पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना रु. १८,७५० + ६,६०० ग्रेड पे) + NPA आणि इतर सुविधांसह ६७ हजार ७०० रुपये पगार दिला जाणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख ६ जानेवारी २०२३ असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ फेब्रुवारी २०२३ आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Railway Jobs: दहावी उत्तीर्णांना मिळेल रेल्वेत नोकरी, ‘येथे’ पाठवा अर्ज
BSNL Recruitment: भारत संचार निगममध्ये बंपर भरती, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …