Kiara Siddharth: ‘लस्ट स्टोरीज’च्या पार्टीत पहिली भेट आणि ‘शेरशाह’ची झाली कियारा

बॉलीवूडमधील शेरशाह जोडी अर्थात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार अशी सगळीकडेच चर्चा आहे. मात्र या दोघांनी अजूनही याबाबत कोणतीच घोषणा केलेली नाही. राजस्थानच्या जैसलमधील सूर्यगडवर या दोघांचे लग्न होणार असून संपूर्ण मीडिया पोहचल्याचेही सध्या दिसून येत आहे. गेले ४ वर्ष एकमेकांना सिद्धार्थ आणि आलिया डेट करत आहेत. मात्र कधीही दोघांनी याबाबत वाच्यता केलेली नाही. कशी झाली यांची भेट आणि कशी सुरू झाली लव्ह स्टोरी जाणून घ्या. (फोटो सौजन्य – @sidmalhotra and @kiaraaliaadvani Instagram)

​लस्ट स्टोरीच्या पार्टीत झाली पहिली भेट​

​लस्ट स्टोरीच्या पार्टीत झाली पहिली भेट​

कियारा अडवाणीने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले होते की तिची आणि सिद्धार्थची पहिली भेट ही ‘लस्ट स्टोरी’च्या पार्टीमध्ये झाली होती. पण ही भेट खूपच कॅज्युअल होती पण कायमस्वरूपी स्मरणात राहणारी होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि ‘शेरशाह’च्या सेटवर ही मैत्री अधिक घट्ट होत गेली.

हेही वाचा :  सिद्धार्थ-कियारावर चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव!

​‘शेरशाह’ पासून जोडले गेले एकत्र नाव​

​‘शेरशाह’ पासून जोडले गेले एकत्र नाव​

‘शेरशाह’च्या शूटिंग दरम्यान या दोघांचे एकत्र नाव जोडले जाऊ लागले. या गोष्टीबाबत दोघांनही कधीच स्पष्टीकरण दिले नाही. मात्र कियाराला सिद्धार्थसह अनेक ठिकाणी एकत्र पाहिले जाऊ लागले. तर सिद्धार्थच्या आई-वडिलांसहदेखील कियारा अनेकदा दिसू लागली. तर मालदिव्ज अथवा काही ठिकाणी दोघेही एकत्र फिरायला गेल्याचेही स्पष्ट झाले होते.

(वाचा – Long Distance Relationship मध्ये कसा कराल व्हॅलेंटाईन डे साजरा, या गोष्टी लक्षात ठेवाल तर भांडणं होणार नाहीत)

​कियाराच्या वाढदिवसासाठी सिद्धार्थचे येणे ठरले खास​

​कियाराच्या वाढदिवसासाठी सिद्धार्थचे येणे ठरले खास​

२०१९ मध्ये कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांसह साऊथ आफ्रिकेला गेले होते. मात्र त्यांनी हे कधीच स्वीकारले नाही अथवा नाकारले नाही. पण कियाराच्या वाढदिवसाला सिद्धार्थ आणि कियारा एकत्रच घरी निघाले होते. त्यानंतर मात्र या गोष्टी प्रकर्षाने समोर येऊ लागल्या.

(वाचा – आई होण्यासाठी कोणत्याही लिंगभेदाची गरज नाही, ट्रान्सजेंडर गौरी सावंत अनेक किन्नरांचा आधार)

​अक्षयकुमारने केली पोलखोल​

​अक्षयकुमारने केली पोलखोल​

कियारा आणि सिद्धार्थने कधीच समोर येऊन हे स्पष्ट केले नाही. मात्र कपिल शर्माच्या शो मध्ये अक्षयकुमारनेच ‘बडी सिद्धांतोवाली है’ असं म्हणत सर्वांनाच हिंट दिली आणि सिद्धार्थ – कियाराच्या नात्याची पोलखोल केली होती. कियारा डेट करत आहे की नाही याचं उत्तर देताना तिने लग्नाची तारीख फिक्स झाल्यावर सांगेन म्हटलं होतं मात्र, अक्षयने मध्येच असे स्टेटमेंट करत गुगलीच टाकली.

हेही वाचा :  हातावर कियाराच्या नावाची मेहेंदी अन् डोळ्यात प्रेम, लव्हबर्ड्सचा लग्नानंतरचा First Look

(वाचा – लग्नाआधी १० वर्षे लपतछपत केले बायकोला डेट तर परेलच्या ब्रिजवर केले प्रपोज, अंकुश चौधरी दीपाची फिल्मी लव्ह स्टोरी)

​करण जोहरच्या शो मुळे झाले स्पष्ट​

​करण जोहरच्या शो मुळे झाले स्पष्ट​

कियारा आणि सिद्धार्थ भांडणामुळे आता वेगळे झालेत अशाही अफवा होत्या. मात्र करण जोहरच्या रियालिटी चॅट शो मध्ये सिद्धार्थला प्रचंड चिडवल्यानंतरही त्याने काहीच म्हटलं नाही आणि कियारा तर लाजून लाजून लाल झाली होती. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना या दोघांमध्ये काहीतरी ‘खास’ नातं असल्याची पुष्टीच मिळाली. तर लवकरच ही जोडी लग्न करेल असा अंदाजही व्यक्त होऊ लागला.

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding: ही लव्ह स्टोरी आता लग्नबंधनात अडकून पूर्ण होणार आहे. सगळेच आता कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाचे फोटो पाहायला आतुर आहेत. पण तुम्हाला ही लव्हस्टोरी कशी वाटली नक्की सांगा.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …