7th Pay Commission:केंद्रीय कर्मचाऱ्यांनी 31 मार्चच्या आधीच पूर्ण करां हे काम; 4500 रुपयांचा थेट फायदा

नवी दिल्ली :7th Pay Commission update : कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाढीव महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मिळाल्यानंतर कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना आता आणखी एक भत्ता मिळू शकतो. जे सर्व कर्मचारी कोरोना संसर्गामुळे बालशिक्षण भत्यासाठी (CEA) साठी दावा करू शकले नाहीत. त्यांना 31 मार्च 2022 पूर्वी त्यासंबधीचा दावा करता येणार आहे.

31 मार्चपूर्वी CEA दावा

केंद्रीय कर्मचार्‍यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भत्ताही मिळतो, जो 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार दरमहा 2,250 रुपये आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी सीईएवर दावा करू शकले नाहीत. त्यामुळे त्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली होती. त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी CEA दावा करा.

CEA दाव्यासाठी अनेक कागदपत्रे आवश्यक

चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सचा दावा करण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना शाळेचे प्रमाणपत्र आणि दावा कागदपत्रे सादर करावी लागतात. कर्मचाऱ्यांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक वर्षाची माहिती द्यावी. तसेच फी आणि इतर आवश्यक डॉक्युमेट जोडावे.

हेही वाचा :  सातव्या वेतन आयोगामुळं सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा पगारवाढ, मूळ वेतनात 'इतकी' वाढ

स्वघोषणा देणे आवश्यक

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) ऑफिस ऑफ मेमोरंडम (OM) जारी केला. ज्यामध्ये असे म्हटले होते की कोरोनामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मुलांच्या शिक्षण भत्त्यावर दावा करण्यात अडचणी येत आहेत. कारण, फी ऑनलाइन जमा केल्यानंतरही शाळेकडून एसएमएस/ई-मेलद्वारे निकाल/रिपोर्ट कार्ड पाठवले गेले नाहीत.

शैक्षणिक भत्त्यासाठीचा दावा विद्यार्थ्यांचे निकाल/रिपोर्ट कार्ड/फी पेमेंट एसएमएस/ई-मेलच्या प्रिंट आउटद्वारे देखील केला जाऊ शकतो. ही सुविधा केवळ मार्च 2020 आणि मार्च 2021 मध्ये संपणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी उपलब्ध असेल.

तुम्हाला किती भत्ता मिळतो?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन मुलांच्या शिक्षणासाठी बालशिक्षण भत्ता मिळतो, प्रति पाल्य हा भत्ता 2250 रुपये प्रति महिना मिळतो. म्हणजे कर्मचाऱ्यांना दोन मुलांसाठी दरमहा 4500 रुपये मिळतात. मात्र, जर दुसऱ्यांदा जुळे बालकं झाली असतील तर पहिल्या अपत्यासह जुळ्या मुलांच्या शिक्षणासाठीही हा भत्ता दिला जातो.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …