IPL नंतर ‘जग जिंकणार’ मुंबई इंडियन्स, मिशन UAEसाठी स्टार खेळाडूंवर मोठी जबाबदारी

मुंबई : मुंबई इंडियन्स टीम ही फक्त आयपीएलपूरती मर्यादीत राहिली नाही. मुंबई इंडियन्सने आंतरराष्ट्रीय स्तरावरही दोन नव्या टीम लीगमध्ये खेळवण्यासाठी उतरवल्या आहेत. त्यापैकी UAE टीमसाठीच्या कोचची नावं फायनल झाली आहेत. दिग्गज कोच टीमसाठी निवडण्यात आले आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या SA T20 लीग आणि UAE च्या T20 लीगसाठी MI केप टाउन आणि MI Emirates या नावाने टीम तयार केल्या आहेत. या दोन्ही टीम लीगमध्ये खेळण्यासाठी उतरणार आहेत. UAE च्या टीमसाठी कोच कोणकोण असणार आहेत त्यांची नाव समोर आली आहेत.

शेन बॉन्ड यांच्याकडे MI Emirates चे हेड कोचपद देण्यात आलं आहे. लवकरच टीम देखील जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेले आणि आता खेळणाऱ्या खेळाडूंचाही समावेश करण्यात येईल असं सांगितलं जात आहे. यामध्ये कोणाला टीममध्ये संधी दिली जाणार याची उत्सुकता देखील असणार आहे.

पार्थिव पटेल, विनय कुमार यांच्यावरही मोठी जबाबदारी मुंबई इंडियन्सकडून सोपवण्यात आली आहे. पार्थिव पटेल बॅटिंग कोच असतील. तर विनय कुमार बॉलिंग कोच असणार आहेत. जेम्स फ्रॅक्लीन हे फिल्डिंग कोच म्हणून महत्त्वाची जबाबदारी निभावणार आहेत.

Published by:Kranti Kanetkar

First published:

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

टीम इंडियाचं कुठे चुकलं? सामन्यानंतर कॅप्टन रोहित शर्मानं दिलं हे स्पष्टीकरण

मोहाली, 20 सप्टेंबर: हार्दिक पंड्या, लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादवनं मोहाली टी20त भारतीय बॉलर्ससाठी बऱ्याच …

रोहित शर्मा करतोय एकच मोठी चूक… तीन सामने, तीन पराभव अन् फक्त एकच गोष्ट ठरतेय मारक

मोहाली : भारतीय संघाला ट्वेन्टी-२० सामन्यात सलग तीन पराभव आता पत्करावे लागले. पण या तिन्ही …