IND vs NZ Live: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IND vs NZ 3rd ODI Score Live : आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिकंत भारताने मालिकेती 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान भारताने आजचा हा सामना जिंकल्यास भारत न्यूझीलंडला व्हाईट वॉश देऊ शकेल. तर दुसरीकडे मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी झीलंड संघाला आज विजय मिळवावा लागणार आहे.

इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप उपयुक्त आहे. याशिवाय येथील चौकारही लहान असल्याने फलंदाजांना खूप मदत मिळते. वेगवान गोलंदाजांना देखील काही प्रमाणात मदत मिळते. मात्र धावा वाचवण्यासाठी गोलंदाजांना कमालीची कसरत करावी लागणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या एकूण पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये, नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने 3 वेळा विजय मिळवला आहे, तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनदा विजय मिळवला आहे. त्यामुळे एकंदरीत नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करणे फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे. 

कसे आहेत दोन्ही संघ?

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक

हेही वाचा :  100 व्या कसोटीत ठोकल्या 200 धावा, वॉर्नरचे एकाच डावात अनेक रेकॉर्ड

न्यूझीलंड : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर/कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले

भारत विरुद्ध न्यूझीलंड Head to Head

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 115 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 57 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. याशिवाय 7 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत सुटला.

कुठे पाहू शकता लाईव्ह सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. .

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …