टी20 क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर नवा विक्रम, विराटला मागे टाकत सेट केला नवा रेकॉर्ड

Rohit Sharma T20 Record: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने 199 धावा करत श्रीलंकेसमोर 200 धावांचे आव्हान ठेवले आहे. यावेळी ईशान, श्रेयस आणि रोहित या तिघांनी धमाकेदार फलंदाजी केली. पण रोहित शर्माच्या 44 धावांनी एक नवा रेकॉर्ड रोहितच्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर आजच्या 44 धावांमुळे 3 हजार 307 धावा जमा झाल्या असून या कोणत्याही खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. रोहितने विराट आणि गप्टील यांना आज मागे टाकले आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या सामन्यात रोहितने 2 चौकार आणि एक षटकार लगावत 32 चेंडूत 44 धावा केल्या. त्याने या खेळीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 123 सामन्यांत 3 हजार 307 धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे त्याने विराट आणि गप्टीलला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे. विराटच्या नावावर 97 सामन्यांत 3 हजार 296 धावा असून गप्टीलच्या नावावर 112 सामन्यांत 3 हजार 299 धावा आहेत. रोहित या सामन्याआधी या दोघांच्या मागे तिसऱ्या स्थानावर होता. पण आजच्या खेळीच्या जोरावर रोहितने पहिलं स्थान मिळवलं आहे.

हेही वाचा :  भारत- श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना पावसामुळं रद्द होण्याची शक्यता

भारताचा पहिला डाव

भारत आणि श्रीलंका यांच्यात पार पडणारा हा पहिला टी20 (1st T20) सामना लखनौच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. ज्यामुळे फलंदाजीला भारताला आधी यावं लागलं आहे. भारताकडून ईशान आणि रोहित या दोघांनी सुरुवातीपासून फटकेबाजी सुरु केली. ईशानने 30 चेंडूत अर्धशतक झळकावलं. तर रोहित मात्र अर्धशतकाजवळ पोहचत 44 धावांवर बाद झाला. ज्यानंतर श्रेयस आणि ईशानने डाव सांभाळला. ईशानने 56 चेंडूत 89 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर त्यानंतर श्रेयस अय्यर याने नाबाद 57 धावा लगावत धावसंख्या 199 पर्यंत पोहोचवली.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …