IGNOU तर्फे पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

IGNOU Admission: इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University, IGNOU) ने पोस्ट बेसिक बीएससी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इग्नूने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून जानेवारी २०२२ पासून सुरू होणाऱ्या बॅचसाठी नर्सिंग अभ्यासक्रमातील प्रवेश केले जातील. इच्छुक उमेदवार इग्नूच्या अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. ही प्रवेश परीक्षा ८ मे २०२२ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर होणार आहे.

इग्नू प्रवेश अर्ज १७ एप्रिलपर्यंत
इग्नूच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया इग्नूच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना १७ एप्रिलपर्यंत मुदत आहे. ऑनलाइन अर्ज भरताना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर उमेदवार त्यांचे परीक्षा केंद्र निवडू शकतात. संबंधित शहरातील परीक्षा केंद्राची आसनक्षमता संपल्यानंतर जवळच्या इतर शहरातील परीक्षा केंद्रे दिली जाणार आहेत.

इग्नू पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंगसाठी पात्रता
इग्नू पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग प्रवेश परीक्षेसाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १ हजार रुपये भरावे लागतील. इच्छुक उमेदवारांकडे नोंदणीकृत नर्स आणि नोंदणीकृत मिडवाइफ (RNRM) च्या प्रशिक्षणानंतर किमान दोन वर्षांचा अनुभव असावा. यासोबतच जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) मध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवाराला RNRM नंतर कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) मध्ये डिप्लोमा असावा.

हेही वाचा :  Karnataka Hijab Row: हायकोर्टाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबबंदी योग्य का ठरवली? वाचा सविस्तर कारणे...

NEET PG 2022: नीट पीजी अर्जांमध्ये दुरुस्तीसाठी विंडो खुली

NIOS दहावी, बारावी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, ‘येथे’ करा डाऊनलोड
इग्नू प्रवेश: असा करा अर्ज
इग्नूच्या अधिकृत वेबसाइटला ignou.ac.in वर जा.
होमपेजवर ‘बीएससी नर्सिंग (पोस्ट बेसिक) प्रवेश परीक्षा-जानेवारी २०२२ सत्रासाठी नोंदणी’ या लिंकवर क्लिक करा.
येथे नोंदणीसाठी एक नवीन पेज उघडेल.
नोंदणी लिंकवर क्लिक करा आणि उघडलेल्या लॉगिन पेजवर नोंदणी करा किंवा लॉगिन करा.
सर्व आवश्यक वैयक्तिक तपशील आणि शैक्षणिक पात्रता भरा.

मुंबई उच्च न्यायालयात दहावी पास असणाऱ्यांना संधी, ६३ हजारपर्यंत मिळेल पगार
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर संस्थेत भरती, ६० हजारपर्यंत मिळेल पगार
स्कॅन केलेले आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि पुढील बटणावर क्लिक करा.
ऑनलाइन अर्जाच्या अंतिम सबमिशननंतर, भरलेला अर्ज डाउनलोड करा.
भविष्यातील संदर्भासाठी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांची हार्ड कॉपी/फोटोकॉपी जोडा.
काऊन्सेलिंगवेळी सर्व कागदपत्रे जमा करावी लागतात, त्यामुळे ती सुरक्षित ठेवावीत.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

KDMC Recruitment: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती, जाणून घ्या तपशील
इंडियन लॉ सोसायटीमध्ये पदवीधरांना नोकरीची संधी, ‘येथे’ करा अर्ज

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …