इग्नू पीएचडी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, ‘येथे’ करा डाऊनलोड

NTA IGNOU PhD 2022 Admit Card: इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University, IGNOU) पीएचडी प्रवेश परीक्षा २०२२ चे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे इग्नू पीएचडी प्रवेश परीक्षा घेतली जाते. एनटीएने इग्नू पीएचडी प्रवेश परीक्षा २०२२ (IGNOU PhD Entrance Exam 2022) चे प्रवेशपत्र/हॉल तिकीट जाहीर केले आहे.

NTA IGNOU च्या अधिकृत वेबसाइटवर ignou.nta.ac.in या प्रवेशपत्राची लिंक (IGNOU PhD Admit Card) सक्रिय करण्यात आली आहे. याशिवाय प्रवेशपत्राची थेट लिंकही बातमीखाली देण्यात आली आहे. तुम्ही तुमचे इग्नू पीएचडी प्रवेशपत्र त्यावर क्लिक करून सहजपणे डाउनलोड करू शकता.

इग्नू पीएचडी प्रवेश परीक्षा २०२२ NTA द्वारे २४ फेब्रुवारी २०२२ रोजी घेतली जाईल. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार त्यांचे हॉल तिकीट (IGNOU PhD Hall Ticket 2022) डाउनलोड करू शकतात.

IGNOU PhD admit card: असे करा डाऊनलोड
इग्नूची अधिकृत वेबसाइट ignou.nta.ac.in वर जा. होमपेजवर IGNOU PhD २०२१-२२ प्रवेशपत्राची लिंक देण्यात आली आहे. त्यावर क्लिक करा.
इग्नू पीएचडी २०२२ प्रवेशपत्राचे पेज खुले होईल.
येथे तुम्हाला दोन लिंक दिसतील.
तुम्ही तुमचे इग्नू हॉल तिकीट २०२२ या दोन्हीपैकी कोणत्याही एका वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
एका लिंकमध्ये तुम्हाला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड भरावा लागेल.
दुसऱ्यामध्ये तुम्हाला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख भरावी लागेल.
तुमच्या प्रवेशपत्रातील सर्व माहिती नीट तपासल्यानंतर ते डाउनलोड करुन प्रिंट घ्या.

हेही वाचा :  High Paying Jobs: 'या' नोकऱ्यांमध्ये मिळेल सर्वाधिक पगार

Bank Job 2022: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती
परीक्षेच्या दिवशी तुम्हाला या प्रवेशपत्राची प्रिंट सोबत ठेवावी लागेल. सोबत वैध फोटो आयडी प्रूफ सोबत ठेवा. तुम्हाला प्रवेशपत्र आणि ओळखपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

इस्टर्न कोलफिल्डमध्ये बारावी उत्तीर्णांना संधी, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार
CISF मध्ये बारावी पास असणाऱ्यांना संधी, ६९ हजारपर्यंत मिळेल पगार
IGNOU PhD Helpline number: इग्नू पीएचडी हेल्पलाइन क्रमांक
प्रवेशपत्रामध्ये काही विसंगती असल्यास तुम्ही एनटीए इग्नू पीएचडी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. तुम्ही ०११-४०७५९००० वर कॉल करून एनटीएशी संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही [email protected] वर ईमेल पाठवून देखील संपर्क साधू शकता.

थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Government Job: एचपीसीएलमध्ये विविध पदांची भरती
CBI Recruitment 2022: सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सारस्वत बँकेत कनिष्ठ अधिकारी पदांची भरती

Saraswat Co-operative Bank Limited Invites Application From 150 Eligible Candidates For Junior Officer Posts. Eligible …

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत विविध पदांची भरती

Employees Provident Fund Organisation Invites Application From 2859 Eligible Candidates For Social Security Assistant & …