MAH CET MBA 2022: एमबीए आणि एमएमएस प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरु

MAH CET MBA 2022: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्रने (State Common Entrance Test Cell, Maharashtra) एमबीए/एमएमएस प्रवेशासाठी महाराष्ट्र सीईटी(MAH CET MBA 2022) नोंदणी सुरू केली आहे. महाराष्ट्र एमबीए सीईटी (MAH CET MBA Application) देण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mbacet2022.mahacet.org वर अर्ज करावा. उमेदवारांना ७ एप्रिल २०२२ पर्यंत महाराष्ट्र एमबीए सीईटीसाठी अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र एमबीए सीईटी २०२२ ची नोंदणी करताना सर्वसाधारण अर्जदारांना १००० रुपये तर आरक्षित वर्गातील उमेदवारांना ८०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहेत.

एमबीए/एमएमएस प्रवेश २०२२-२३ महाराष्ट्र सीईटी साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना पात्रता तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एमबीए सीईटी २०२२ प्रवेशपत्र मिळविण्यासाठी अर्जदारांना अंतिम मुदतीपूर्वी एमबीए सीईटी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तसेच ३ वर्षांच्या कालावधीत किमान ५० टक्के गुणांसह (आरक्षित श्रेणीसाठी ४५ टक्के) पदवी पूर्ण केलेले उमेदवार महाराष्ट्र एमबीए सीईटी २०२२ साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. अंतिम वर्षाचे पदवीधर देखील एमबीए/एमएमएस प्रवेश २०२२-२३ साठी अर्ज भरु शकतात.

NBCC India मध्ये विविध पदांवर नोकरीची संधी, ‘येथे’ करा अर्ज
MAH MBA CET application form 2022: अशी करा नोंदणी

हेही वाचा :  Police Recruitment: पोलीस भरतीचे अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट

स्टेप १) सर्वप्रथम महाराष्ट्र सीईटीची अधिकृत वेबसाइट mbacet2022.mahacet.org वर जा.

स्टेप २) महाराष्ट्र सीईटी वेबसाइटच्या होमपेजवर ‘नवीन नोंदणी’ या लिंकवर क्लिक करा.

स्टेप ३) चेकबॉक्सवर क्लिक करा आणि पेजवरील ‘I Accept and Proceed’ बटणावर क्लिक करा.

स्टेप ४) आता MAH CET 2022 लॉगिन क्रेडेंशियल तयार करण्यासाठी सर्व आवश्यक तपशील भरा.

MAH LLB CET 2022: महाराष्ट्र लॉ सीईटीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु
IIIT नागपूरमध्ये भरती, डिप्लोमा आणि पदवीधरांना नोकरीची संधी
स्टेप ५) अर्ज भरण्यासाठी तयार केलेल्या लॉगिन क्रेडेंशियल्सचा वापर करून डॅशबोर्डवर पुन्हा लॉगिन करा.

स्टेप ६) MBA/MMS प्रवेशासाठी ‘MAH CET 2022 अर्ज फॉर्म’ भरा.

स्टेप ७) त्यानंतर आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यात अपलोड करा.

स्टेप ८) महाराष्ट्र सीईटी अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरा.

यूजीसी आणि AICTE कडून क्रॉसवर्ड स्पर्धा २०२२ च्या नोंदणीला सुरुवात
नोकरीच्या शोधात असाल तर ‘या’ ६ टिप्स नक्की फॉलो करा
अर्ज शुल्क
सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना १००० रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल. तर आरक्षित आणि पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना ८०० रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल.

हेही वाचा :  Munmun Dutta Education: जेठालालची क्रश 'बबीता' कितवी शिकलीय माहितेय का?

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज थकीत, सरकार दिलासा देणार का?
नागपूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये भरती, ७५ हजारपर्यंत मिळेल पगार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …