सिनेसृष्टीत मुलाला काम मिळत नसल्यानं मराठमोळ्या अभिनेत्रीनं व्यक्त केली नाराजी, म्हणाली…


बॉलिवूडमध्ये स्टार किड्सना बाहेरून आलेल्या कलाकाराच्या तुलनेत सहज काम मिळतं असं नेहमीच बोललं जातं. प्रत्येक वर्षी बरेच स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसतात. पण सर्वांच्याच बाबतीत असं घडत नाही. मराठी तसेच बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या मुलाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. आई प्रसिद्ध अभिनेत्री, वडीलही सिनेसृष्टीशी संबंधित आणि तरीही त्यांच्या मुलाला सिनेसृष्टीत काम मिळत नाही यावर किशोरी शहाणे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाराजी व्यक्त केली आहे.

किशोरी शहाणे यांची तक्रार आहे की, नावाजलेले कलाकार नव्या आणि टॅलेंटेड कलाकारांनी संधी मिळूच देत नाहीत. रोनित रॉय, बाबा सहगल, अली असगर यांची नावं घेत किशोरी शहाणे म्हणाल्या, ‘माझे पती दीपक बलराज यांनी अलिकडच्या काही काळात अनेक नव्या कलाकारांना संधी दिली आहे. यामध्ये गायक, अभिनेता यांचा समावेश आहे. पण या इंडस्ट्रीमध्ये करिअर करणं आता एवढं सोप राहिलेलं नाही.’

आणखी वाचा- नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड

किशोरी शाहणे यांची तक्रार आहे की, त्यांचा मुलगा बॉबी विज याला अद्याप बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळालेला नाही. २५ वर्षीय बॉबी मागच्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत किशोरी शहाणे सांगतात, ‘माझा मुलगा फार कमी वयापासून नाटकांमध्ये काम करत आहे. मात्र त्याला अद्याप बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळालेला नाही. मला वाटतं त्याच्या टॅलेंटला वाव मिळायला हवा. त्याला इंडस्ट्रीमध्ये काम मिळायला हवं. जर आम्ही अनेक वर्ष या इंडस्ट्रीला दिली आहेत तर आमच्या मुलाला किमान एक प्लॅटफॉर्म तर नक्कीच मिळायला हवा.’

आणखी वाचा- “लग्नाच्या पहिल्याच रात्री तिने…”, भाग्यश्रीच्या पतीनं शेअर केलं ‘ते’ सीक्रेट

सिनेसृष्टीतील घराणेशाहीबद्दल बोलताना किशोरी शहाणे म्हणाल्या, ‘मला मुळात हा शब्दच समजत नाही. मला केवळ माझ्या मुलाच्या कौशल्यावर विश्वास आहे. तो ऑलराउंडर आहे. तो ज्या व्यक्तींशी बोलतो त्या सर्वांना तो आवडतो. तो माझ्यासोबतही वेगवेगळ्या विषयांवर तासंतास गप्पा मारतो. त्यामुळे त्याच्या कौशल्यावर त्याला एक चान्स तरी मिळायला हवा असं मला वाटतं.’

The post सिनेसृष्टीत मुलाला काम मिळत नसल्यानं मराठमोळ्या अभिनेत्रीनं व्यक्त केली नाराजी, म्हणाली… appeared first on Loksatta.Source link

हेही वाचा :  कथित गर्लफ्रेंड सबा अझादच्या व्हिडीओवर हृतिक रोशनची कमेंट चर्चेत, म्हणाला…

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या …