- 1 HP layoffs:एचपी आयएनसी मधील ही कपात त्यांच्या सध्याच्या कर्मचार्यांच्या सुमारे १० टक्के असल्याचे म्हटले जाते. हा कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्या योजनांचा एक भाग आहे. एचपीची सतत कमी होत चाललेली विक्री आणि अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे कंपनी हे करणार आहे. किंबहुना कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या तिमाहीतील महसुलात ११.२ टक्क्यांनी घट झाली आहे. जी एका वर्षापूर्वी याच तिमाहीत $१४.८ अब्ज नोंदवली गेली होती.
- 2 १० टक्के कर्मचारी कामावरून कमी करणार
- 3 एचपी प्रोडक्टच्या विक्रीत घट
- 4 कंपनीच्या सीईओचे विधान
HP layoffs:एचपी आयएनसी मधील ही कपात त्यांच्या सध्याच्या कर्मचार्यांच्या सुमारे १० टक्के असल्याचे म्हटले जाते. हा कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्या योजनांचा एक भाग आहे. एचपीची सतत कमी होत चाललेली विक्री आणि अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे कंपनी हे करणार आहे. किंबहुना कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या तिमाहीतील महसुलात ११.२ टक्क्यांनी घट झाली आहे. जी एका वर्षापूर्वी याच तिमाहीत $१४.८ अब्ज नोंदवली गेली होती.
हायलाइट्स:
- जागतिक मंदीचे परिणाम
- एचपीमधून होणार कर्मचारी कपात
- ६ हजार कर्मचार्यांना मिळणार नारळ
१० टक्के कर्मचारी कामावरून कमी करणार
HP Inc मधील ही कपात त्यांच्या सध्याच्या कर्मचार्यांच्या सुमारे १० टक्के असल्याचे म्हटले जाते. हा कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्या योजनांचा एक भाग आहे. एचपीची सतत कमी होत चाललेली विक्री आणि अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे कंपनी हे करणार आहे. किंबहुना कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या तिमाहीतील महसुलात ११.२ टक्क्यांनी घट झाली आहे. जी एका वर्षापूर्वी याच तिमाहीत $१४.८ अब्ज नोंदवली गेली होती.
एचपी प्रोडक्टच्या विक्रीत घट
कमी झालेली प्रोडक्ट विक्री हे कर्मचारी कपातीमागचे कारण असल्याचे कंपनीने म्हटले आहे. पर्सनल कॉम्प्युटर कंपन्यांना अलीकडच्या काही महिन्यांत मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. चौथ्या तिमाहीत आमच्या कॉम्प्युटर विभागाच्या विक्रीत १३ टक्के घट झाली आहे आणि ती १०.३ अब्ज डॉलरवर आली आहे. यामुळे कंपनीच्या एकूण ग्राहक महसुलात वर्षभरात २५ टक्क्यांची घट झाल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
कंपनीच्या सीईओचे विधान
अस्थिर मॅक्रो वातावरण आणि मागणी कमी झाल्यामुळे गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या उत्पादनांची विक्री कमी झाल्याचे एचपी इंक.चे सीईओ एनरिक लोरेस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.