Sharad Pawar Education: ४ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शरद पवारांच्या शिक्षणाविषयी जाणून घ्या

Sharad Pawar Education: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व आहे. केवळ राज्यच नव्हे तर देशाच्या राजकारणातही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. १२ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असतो. त्यांचे पूर्ण नाव शरद गोविंदराव पवार. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) संस्थापक आणि ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार हे आतापर्यंत चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. याशिवाय ते केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. दरम्यान शरद पवार यांच्या शिक्षण आणि राजकीय कारकिर्दीबद्दल जाणून घेऊया.

शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती, पुणे येथे झाला. त्यांचे वडील गोविंदराव पवार हे बारामती शेतकरी सहकारी बँकेत कामाला होते. तर त्यांची आई शारदाबाई पवार या गृहिणी होत्या. शरद पवार यांना नऊ भावंडे आहेत. बारामती येथील सरकारी शाळेतून शरद पवार यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. दरम्यान १ ऑगस्ट १९६७ रोजी प्रतिभा शिंदे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांची मुलगी सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघातून खासदार आहेत.

हेही वाचा :  'म्हणायला ठाकरे सरकार पण लाभ घेते पवार सरकार', शिवसेना खासदाराची नाराजी

कॉलेजमध्येच शरद पवारांचा राजकारणात प्रवेश

शरद पवार यांनी शिक्षणादरम्यान राजकारणात प्रवेश केला होता. कॉलेजमध्ये असताना त्यांनी महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली आणि सरचिटणीस बनले. यानंतर शरद पवार यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांची भेट घेतली. यशवंतराव यांनी शरद पवारांची क्षमता ओळखून त्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य बनवले.

वाइल्डलाइफ फोटोग्राफर ते संयमी शिवसेना पक्षप्रमुख, उद्धव ठाकरेंच्या शिक्षणाविषयी जाणून घ्या

४ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

१९६७व मध्ये बारामतीतून विधानसभा निवडणूक जिंकून शरद पवार पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. त्यानंतर त्यांनी १९७२ आणि १९७८ मध्ये सलग निवडणुका जिंकल्या. शरद पवार १९७८ मध्ये पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर १९८८, १९९० आणि १९९३ मध्ये ते मुख्यमंत्री राहिले. शरद पवार यूपीए आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.

काँग्रेसपासून वेगळे होऊन स्वत:चा पक्ष स्थापन

१९९९ मध्ये शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. खरे तर या तिघांनीही पक्षाची धुरा सोनिया गांधी यांच्याकडे देण्यावर आक्षेप घेतला होता. यानंतर २५ मे १९९९ रोजी शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. असे असले तरीही शरद पवार यांचा पक्ष विभक्त होऊनही यूपीएचा एक भाग राहिला.

हेही वाचा :  IIT Kanpur ला माजी विद्यार्थ्याकडून १०० कोटींची देणगी

महापरिनिर्वाण दिन: बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या १० गोष्टी जाणून घ्या, गर्वाने म्हणाल ‘जय भीम’

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …