Sharad Pawar birthday : वडिलांना शुभेच्छा देत Supriya Sule झाल्या भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या…

Happy Birthday Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि देशाचे अखंड उर्जा स्त्रोत असणारे शरद पवार (Sharad Pawar)…नावातच सगळं आलं. आज त्यांचा वाढदिवस (Sharad Pawar birthday). त्यांचावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अशातच त्यांची लेक आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) कशा मागे राहतील. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचं नातं खूप खास आहे. 

राजकीय कुटुंबातून आलेल्या सुप्रिया सुळे आणि शरद पवार (Supriya Sule & Sharad Pawar) यांचं नातं खूप खास आहे. एका इस्लामपूरमधील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांविषयी सांगताना एक कविता म्हटली होती. श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी…अशा त्या कवितेच्या ओळी आहेत. माझा बाप माझ्यासाठी एक बुलंद कहाणी आहे”, (supriya sule wishes Sharad Pawar birthday latest marathi news video)

 

प्रिय बाबा,

सुप्रिया सुळे सोशल मीडियावर (Social media) तुफान सक्रीय असतात. शरद पवार यांना त्यांनी ट्विटरवर (Twitter) शुभेच्छा दिल्या तेव्हा त्या भावूक झाल्या. त्या लिहितात की, ”प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. समाजकारण, राजकारण या क्षेत्रांसह कौटुंबिक पातळीवर देखील तुम्ही आम्हा सर्वांचे आदर्श आहात. तुमच्या विचारांची स्वाभिमानी मशाल घेऊन आम्ही सर्वजण आपल्यासोबत अविश्रांत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत.”

लेक असावी तर अशी!

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील नातं हे कायम सार्वजनिक ठिकाणीही दिसून आलं. ज्यावेळी गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी (Funeral of Lata Mangeshkar) शिवाजी पार्कवर शरद पवार गेले होते तेव्हाची गोष्ट..तेव्हा बापा लेकीचं नातं कॅमेऱ्यात कैद झालं. 

हेही वाचा :  "महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळेस उपाशी राहील पण..."; 'काही सहकारी बळी पडले' म्हणत शरद पवारांचं सूचक विधान

supriya_sule

लतादीदींना शेवटचा निरोप देताना शरद पवार यांनी पायातील बूट काढले होते. अंत्यदर्शन झाल्यावर जेव्हा साहेब खुर्चीवर येऊन बसले तेव्हा लेक सुप्रियाताईंनी कसलीही तमा न बाळगता वडिलांच्या पायात बूट घालून दिले. असं हे बाप लेकीचं नातं जगावेगळं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …