बरगड्या दुखेपर्यंत खोकला येतोय का? करा हे घरगुती उपाय मिळेल त्वरीत आराम

Cough Home Remedies: बदलत्या हंगामानुसार सर्दी आणि खोकला होणे ही सामान्य बाब आहे. पण रात्री खोकला यायला लागला की अत्यंत कठीण होतं. खरं तर खोकला रात्री झोपेच्या वेळीच अधिक बळावतो आणि या खोकल्यामुळे गळ्यात आणि आतड्यांमध्येही व्हायरल संक्रमण होण्याची शक्यता अधिक वाढते. तसंच शरीरातील पार बरगड्या दुखेपर्यंत जर तुम्हाला खोकला येत असेल तर तुम्ही काही सोपे घरगुती उपाय पटकन करून शकता. खोकल्यावर करा हे घरगुती उपाय आणि त्वरीत मिळवा आराम! (फोटो सौजन्य – Freepik.com, Canva)

​मध आहे रामबाण उपाय​

​मध आहे रामबाण उपाय​

Honey For Cough: मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात, जे खोकला घालविण्याचे सोपे साधन आहे. तसंच मध हा खोकल्यावरील रामबाण उपाय आहे जो परंपरागत चालत आला आहे. मधासह तुम्ही आल्याचा तुकडा चाऊन खाल्ल्यास अधिक फायदा मिळू शकतो. मात्र लहान मुलांना खोकला असेल तर हा उपाय अजिबात करू नका.

​हळदीने करा खोकल्यावर जादू​

​हळदीने करा खोकल्यावर जादू​

Turmeric For For Cough: हळद हा अनेक आजारांवरील घरगुती उपाय आहे. हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात. यामुळेच आयुर्वेदातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खोकला झाला असल्यास, तुम्ही एका ग्लासात संत्र्यांचा रस काढा. त्यात एक चमचा हळद पावडर आणि चिमूटभर काळी मिरी पावडर मिक्स करा. हा रस तुम्ही प्यायल्यास तुम्हाला खोकल्यापासून लवकर सुटका मिळते.

हेही वाचा :  'हा' रहस्यमय फोटो सांगणार तुमचं व्यक्तीमत्व, तुम्हाला यामध्ये पहिलं काय दिसलं?

(वाचा – बाबा रामदेव यांनी दिला परफेक्ट Diet Plan, फॉलो कराल तर अनेक आजारांपासून राहाल दूर)

​लसूण ठरते फायदेशीर​

​लसूण ठरते फायदेशीर​

Garlic For Cough: लसणामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. त्यामुळे तुम्ही लसूण भाजून खाल्ल्यास सर्दी, खोकला या आजारांवर अत्यंत गुणकारी ठरते. खोकला झाल्यावर मुद्दाम लसूण भाजून खावी. त्वरीत आराम मिळतो.

(वाचा – डायबिटीसमध्ये या पिठामुळे शोषली जाते रक्तातील साखर, Blood Sugar Level कमी होण्यासाठी करा वापर)

​आल्याचा करा वापर​

​आल्याचा करा वापर​

Ginger For Cough: आल्यातील गुणधर्मांमुळे खोकला लवकर बरा होतो. बरेचदा खोकला आल्यावर आलेपाकही खाण्याचा सल्ला देण्यात येतो. तर तुम्हाला अति खोकला असेल तर तुम्ही एक ग्लास पाण्यात आले कुटून अथवा किसून घालावे आणि पाणी उकळून घ्यावे. हे पाणी गाळून गरम प्यावे. याशिवाय आले कच्चेही चावल्यास तुम्हाला खोकला जाण्यासाठी फायदा मिळतो.

​गरम पाणी आणि मिठाच्या गुळण्या​

​गरम पाणी आणि मिठाच्या गुळण्या​

गरम पाण्यात एक चमचा मीठ मिक्स करून घ्या आणि या गरम पाण्याने तुम्ही घशात पाणी घेऊन गुळण्या करा. यामुळे घशाला आराम मिळतो आणि लवकरच खोकला बरा व्हायलाही मदत मिळते. हा अत्यंत परंपरागत करण्यात येणारा उपाय आहे.

हेही वाचा :  वसईत CBI ची धाड; नोकरीच्या बहाण्याने भारतीय नागरिकांना रशिया युक्रेन युद्धात पाठवले

(वाचा – युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात आणेल गरम पाणी, कसे प्यावे योग्य पद्धत घ्या जाणून)

​काळी मिरी​

​काळी मिरी​

खोकल्यासह तुम्हाला बलगमचाही त्रास होत असेल अथवा खोकला जास्त काळ येत असेल तर तुम्ही अर्धा चमचा काळ्या मिरी पावडरमध्ये घरातील एक चमचा तूप मिक्स करा आणि याचे सेवन करावे. यामुळे आरामही मिळतो आणि खोकला जाण्यास मदत मिळते.

वरील सर्व उपाय हे घरगुती आहेत. तसंच हे पूर्वपरंपरागत करण्यात येणारे उपाय आहेत. यापैकी कोणत्याही पदार्थांची अलर्जी असल्यास, याचा वापर करू नये आणि खोकला थांबतच नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …